पाकिस्तानात ‘त्या’ कोसळलेल्या विमानाच्या अवशेषात सापडल्या ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या बॅगा! | पुढारी

पाकिस्तानात 'त्या' कोसळलेल्या विमानाच्या अवशेषात सापडल्या 'इतक्या' कोटी रुपयांच्या बॅगा!

कराची (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. हे विमान २२ मे रोजी दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानात ९९ प्रवासी होते. यामध्ये केवळ दोन पुरूषांचा जीव वाचला. आता या विमानाच्या अवशेषामधून दोन पैशांनी भरलेल्या बॅग सापडल्या आहेत. त्यामुळे इतके पैसे आले कोठून, याची चौकशी होणार आहे.    

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, तपासकर्ते आणि बचाव अधिकाऱ्यांना विमानाच्या अवशेषातून दो बॅग मिळाल्या आहेत. या बॅगमध्ये पैसे आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोन बॅगमध्ये पाकिस्तानी चलनासोबत परदेशी चलनदेखील आहे. सर्व मिळून एकूण किंमत जवळपास ३० दशलक्ष रुपये आहे. 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इतकी मोठी रक्कम विमानात आली कोठून? याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावर प्रवाशांच्या सामानाचे स्कॅनिंग करताना ही रक्कम कशी दिसली नाही? याचे आदेश देण्यात आले आहेत. अवशेषातून बाहेर काढण्यात आलेले मृतदेह आणि साहित्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटल्यनंतर ज्या प्रवाशांचे साहित्य आहे, ते त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येईल.आतापर्यंत ९७ पैकी ४७ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. ४३ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. 

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान कराचीतील जिना विमानतळाजवळील दाट लोकवस्तीत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून सुमारे ९९ जण होते. यातील ९७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून दोन पुरुष प्रवासी बचावले होते. 

Back to top button