कोरोनाचा सफाया करणारा रोबोट तयार | पुढारी

कोरोनाचा सफाया करणारा रोबोट तयार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

कोरोनाचा सफाया करणारा एक रोबोट ‘एमआयटी’ या विद्यापीठाने  तयार केला आहे. हा रोबोट अर्ध्या तासात 4 हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या एखाद्या गोदामाचा मजला संक्रमणमुक्त करू शकतो. त्याचा वापर मोठी दुकाने तसेच शाळांमधील साफसफाईसाठीही होऊ शकतो.

विद्यापीठाने अवा रोबोटिक्स आणि ग्रेटर बोस्टन फूड बँकेच्या संयुक्त सहकार्याने हा रोबोट विकसित केला आहे. हा रोबोट कस्टम यूव्ही-सी लाईटचा वापर करून पृष्ठभाग संक्रमणमुक्त करतो आणि हवेत तरंगणार्‍या कोरोना व्हायरसचे कण प्रभावहिन करतो.

Back to top button