पीएम इम्रान खान यांना त्यांच्याच परराष्ट्र विभागाकडून थेट इशारा! | पुढारी

पीएम इम्रान खान यांना त्यांच्याच परराष्ट्र विभागाकडून थेट इशारा!

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने पंतप्रधान इम्रान खान यांना चीनच्या पाठिंब्याबाबत थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानने चीनला पाठिंबा देणे थांबवले नाही तर जागतिक स्तरावर वेगळे पडण्याचा सामना करावा लागेल, असा परराष्ट्र विभागाने थेट इशारा दिला आहे. अलीकडेच चीनच्या सांगण्यावरून पाकिस्तानने लडाखच्या सीमेवर सैन्य तैनात वाढवली आहे.

अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून कोरोना पॉझिटिव्ह!

परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, भारताशी आगळीक आणि कोरोना संकटामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय टीका होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने चीनबरोबरच्या धोरणांबाबत आढावा न घेतल्यास जगाच्या आर्थिक महासत्तांचा रोष भडकला जाईल. भारताशी झालेल्या संघर्षानंतर जागतिक महासत्ता चीनला जागतिक पातळीवर वेगळं पाडण्यासाठी काम करत आहेत. 

अधिक वाचा : अन्यथा गंभीर परिणाम भोगाल, ‘या’ छोट्या देशाची चीनला धमकी

अमेरिकेसह युरोपमधील अनेक देश चीनच्या विस्तारवादी धोरण आणि कट्टरतेविरूद्ध उघडपणे विरोध करीत आहेत. युरोपियन युनियन आणि ब्रिटनने पाकिस्तानी एअरलाईन्सच्या विमानांवर बंदी घातली तेव्हा चीनला आंधळेपणाने पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानला पहिला धक्का बसला. युरोपीयन देशांना पात्र पायलट आहेत हे पटवून देण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न केले पण या देशांनी निर्णय बदलला नाही.

अधिक वाचा : भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु!

चीनविरूद्ध फक्त जागतिक स्तरावर नव्हे, तर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांत आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्येही तीव्र विरोध आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये स्थानिक नागरिकांना कोणताही सहभाग देण्यात आलेला नाही असा येथील नागरिकांचा आरोप आहे. येथून स्त्रोताचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. या प्रकल्पात काम करण्यासाठी स्वस्त कामगार चीनकडून बोलविले जात आहेत. चीन येथील परंपरेचादेखील आदर करीत नाही.

अधिक वाचा : भारतानंतर आता अमेरिकेकडूनही चीनला दणका सुरु!

परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, समान आव्हानांचा सामना करताना दोन्ही देशांमध्ये परस्परांना साथ देण्याची परंपरा आहे. भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कुरेशी यांनी त्यांच्या चिनी समकक्ष वांग यीशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये चर्चा मुख्यत्वे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थितीवर होती.  पाकिस्तानने पुन्हा एकदा ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा दर्शवल आहे. हाँगकाँग, तैवान, तिबेट आणि झिनजियांगमध्ये चीनला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा : थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट; इंटरपोलकडेही मागितली मदत!

Back to top button