विमानतळावर त्रास होताच जुही चावला संतापली! | पुढारी

विमानतळावर त्रास होताच जुही चावला संतापली!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ची सहमालकिण जूही चावलाने एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) वर संताप व्यक्त केला आहे. ती आयपीएल २०२० संपल्यानंतर यूएई (UAE) तून परतत होती. पण, ती विमानतळावर अडकली आणि प्रवाशांच्या गर्दीमध्ये तिला मनस्ताप सहन करावा लागला.  

जुहीने एक व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, ‘एअरपोर्ट आणि सरकारच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की, तत्काळ अधिक अधिकारी नियुक्त करा आणि एअरपोर्ट हेल्थ क्लीअरन्ससाठी अधिक काऊंटर उपलब्ध करून द्या. सर्व प्रवासी दीर्घकाळ येथे अडकले आहेत. एकानंतर एक विमान. खूप खराब आणि लज्जास्पद स्थिती.’

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ५३ वर्षांची अभिनेत्री जुही चावला अनेक प्रवाशांसोबत विमानतळावर अडकली आहे आणि व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, ‘या कारणामुळे कोरोनाचे संक्रमण पसरेल आणि यास आपण जबाबदार असाल.’ 

जुहीने हे सांगितलं नाही की, ती कोणत्या विमानतळावर अडकली आहे. एएआयने जुहीच्या या तक्रारीवर प्रतिक्रिया देत ट्विट केलं की, ‘आपणास जो त्रास झाला, त्यासाठी आम्ही खंत व्यक्त करतो. कृपया आम्हाला सांगा की, आपण कोणत्या विमानतळावर आहात, आम्हाला ही समस्या लवकरात लवकर सोडवता येईल.’

Back to top button