अमेरिकेवर भारताचं १५ लाख कोटींचं कर्ज! | पुढारी

अमेरिकेवर भारताचं १५ लाख कोटींचं कर्ज!

वाॅशिंग्टन ः पुढारी ऑनलाईन 

कोरोनाचा फटका भल्याभल्या देशांना बसला आहे, त्यांचा आर्थिक विकास दर चांगलाच घसरला आहे, त्यातून सावरण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतलं आहे. त्यात महासत्ता समजली जाणारी अमेरिकाही मागे नाही. उलट ती आघाडीवर आहे. कोरोनामुळे अमेरिकेवर कर्जाचा डोंगर उभा आहे. खरं तर भारतापेक्षा ७ पटींनी मोठी असणाऱ्या अमेरिकेच्या विकासाचा दर हा कर्जाच्या चिखलात रुतून बसला आहे. यामध्ये भारतानंही अमेरिकेला कर्ज दिलंय आणि तेही २१६ अब्ज डाॅलरचं म्हणजेच १५ लाख करोड रुपयांचं कर्ज भारतानं दिलं आहे. 

वाचा ः मराठा आरक्षणासाठी आज सह्याद्री अतिथिगृहावर बैठक

अमेरिकेवर सध्या २९ ट्रिलियन डाॅलरचं कर्ज आहे. त्याची आपल्या देशाशी तुलना केली तर, हे कर्ज भारतीय अर्थव्यवस्थेच्या दहा पटीने जास्त आहे. त्यात भारताचे १५ लाख करोड रुपये आहेत. इतकंच नाही तर, कट्टर स्पर्धक असणाऱ्या चीनकडून आणि जपानकडूनही अमेरिकेने प्रत्येकी १ ट्रिलियन डाॅलर्सचं कर्ज घेतलेलं आहे. याचा खोलात जाऊन विचार केला तर अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकांवर ८४ हजार डाॅलर्स अर्थात ६० लाख रुपयांचं कर्ज आहे, असं म्हणता येतं.

वाचा ः अवघ्या सात दिवसांत ११८५ इमारती सीलमुक्त!

अमेरिकेचे काॅंग्रेसमन अलेक्स मूनी यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, “अमेरिकेने चीन आणि जपानकडून सर्वात जास्त कर्ज घेतलं आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे शत्रू आहेत. चीन हा नेहमीच अमेरिकेचा कट्टर स्पर्धक राहिलेला आहे. असं असूनही अमेरिकेने त्यांच्याकडून १ ट्रिलियन डाॅलर्स आणि जपानकडून १ ट्रिलियन डाॅलर्स कर्ज घेतलं आहे. ब्राझील देशाचंही कर्ज अमेरिकेवर असून २५८ अब्ज डाॅलर्स कर्ज आहे. हे कर्ज ओबामा राष्ट्राध्यक्षांच्या काळात वाढलेलं आहे. हे कर्ज नंतर वाढतच गेलं आहे”, असंही मूनी यांनी सांगितलं.

Back to top button