कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगाच टेन्शन वाढ‍वलं! ‘या’ सहा देशात पुन्हा लॉकडाऊन | पुढारी

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगाच टेन्शन वाढ‍वलं! 'या' सहा देशात पुन्हा लॉकडाऊन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आता जगभरात पाय पसरत आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटमुळे लॉकडाऊनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करत आहेत. कोरोना वरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याच दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या अभ्यासात समोर आलं आहे. 

या अभ्यासात ६३ लोकांचा समावेश होता ज्यामध्ये हे संक्रमण आढळले आहे. यापैकी ३६ रुग्णांना दोन डोस देण्यात आले, तर २७ जणांना लसीचा एक डोस दिला. भारतात पहिल्यांदा सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेन चिंता व्यक्त केली आहे. 

जगातील या सहा देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट ने पाय पसरलेत

१) कोविड 19 च्या डेल्टा प्रकाराचा शोध लागल्यानंतर झिम्बाब्वे सरकारने शनिवारी हुरंगवे आणि करीबा जिल्ह्यात दोन आठवड्यांचा स्थानिक लॉकडाऊनची घोषणा केली. गेल्या तीन दिवसांत ४० हून अधिक रुग्णांना लागण झाल्याचे  सरकारने म्हटले आहे.

२) ब्रिटनमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंट च्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे २१ जून नंतर लॉकडाउनचे निर्बंध वाढवण्याचे नियोजना आहे. आठवड्यात डेल्टा व्हेरिएंट रुग्णांमध्ये तीस हजारांनी वाढ झाली असल्याच पब्लिक हेल्थ इंग्लंडला आढळले आहे. 

३) युरोप – डेल्टा व्हेरिएंट चे रुग्ण वाढू शकतात अस डब्ल्यूएचओच्या युरोपच्या संचालकांनी म्हटल आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. डब्ल्यूएचओ डॉक्टर हंस क्लूगे म्हणाले की, डेल्टा प्रकारात काही लसी काम करत आहेत. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक असुरक्षित आहेत. 

४) फ्रान्स- कोविड-19 चा डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णांची माहिती घेण्याच काम सुरु आहे. फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आहेत, विशेषत: दक्षिण-पश्चिम भागात आहेत. अस आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी म्हटल आहे. 

५) श्रीलंका- बेटांच्या देशांमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे आढळला आहे. श्री जयवर्डेनपुरा विद्यापीठाच्या इम्यूनोलॉजी अणि आण्विक औषध विभागाच्या संचालिका डॉ. चंडीमा जीवनंदरा यांनी सांगितले की, क्वारंटाईन ठेवलेल्या एका रुग्णामध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. श्रीलंकेमध्ये एप्रिलपासून कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे.

६) चीन- चीनमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण ग्वांगझोमध्ये २१ मे पासून १०० पेक्षा जास्त सापडली आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ग्वांगझोमधील रुग्ण डेल्टा व्हेरिएंट संसर्गमुळे वाढली आहेत. 

डेल्टा प्रकार आधीच्या अल्फाच्या तुलनेत १०० पटीने अधिक पसरू शकतो. असा काही तज्ञांचा आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ह्युमन इव्होल्युशनरी स्टडीजचे पीएचडी उमेदवार जोनाथन आर. गुडमन यांनी शनिवारी सांगितले की, पहिल्या आणि दुसर्‍या लसीच्या डोस दरम्यान कालावधी वाढविण्याच्या यूके सरकारच्या निर्णयामुळे लोकांना डेल्टा प्रकारात संसर्ग होण्याची शक्यता आहे.

वाचा : नारायण राणे दिल्लीला रवाना! मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

वाचा : सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार होणारी Novavax व्हॅक्सिन ९० टक्के प्रभावी

Back to top button