Russia Ukraine War: युद्धात अडकलेल्या पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरसाठी भारतीय डॉक्टरने लावली जीवाची बाजी! | पुढारी

Russia Ukraine War: युद्धात अडकलेल्या पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरसाठी भारतीय डॉक्टरने लावली जीवाची बाजी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनविरुद्ध (Russia Ukraine War) सुरू केलेल्या युद्धामुळे अनेकांना स्थलांतर करावे लागत आहे. भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून आपल्या नागरिकांना सुरक्षीत मायदेशात आणले. भारतीय विद्यार्थी त्यांच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांसह परतले असताना एका भारतीय डॉक्टरने युद्धग्रस्त युक्रेनमध्ये त्यांच्या पाळीव बिबट्या आणि ब्लॅक पँथरसह तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मूळचे आंध्र प्रदेशामधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तनुकू चे रहिवासी असलेले डॉ. कुमार सध्या डॉनबास येथील त्यांच्या घरी बांधलेल्या बंकरमध्ये राहत आहेत.

युक्रेनमधील युद्धाच्या (Russia Ukraine War) भोवऱ्यात अडकलेले भारताचे डॉ. गिरी कुमार यांना त्यांच्या पाळीव प्राणी ‘लेपर्ड अँड ब्लॅक पँथर’च्या सुरक्षेची जास्त काळजी आहे.

‘हा केवळ माझ्या सुरक्षिततेचा आणि जगण्याचा प्रश्न नाही तर बिबट्या आणि ब्लॅक पँथरच्याही जीवाचा प्रश्न आहे. इश्वराच्या कृपेने आशेचा किरण दिसेपर्यंत मला माझ्या पाळीव प्राण्यांना आणि स्वतःला वाचवण्याशिवाय पर्याय नाही’, पीटीआयशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. (Russia Ukraine War)

कुमार बंदी ने कहा- मैं अपने पेट्स को मरते दम तक नहीं छोड़ूंगा, अगर मैं मरता हूं तो उनके साथ ही मरूंगा।

डॉक्टर कुमार आपल्या पाळीव प्राण्याला इतरांच्या दयेवर सोडू इच्छित नाहीत. बंकरमधून ते दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करतात. डॉ.कुमार अनेक वर्षांपासून युक्रेनमध्ये कार्यरत आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थित त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले. परंतु त्यांनी स्वतः भारतात परण्यास नकार दिला. ते आपल्या बिबट्या आणि ब्लॅक पँथरसह युक्रेनमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Russia Ukraine War)

कुमार १५ वर्षांपूर्वी एमबीबीएस करण्यासाठी युक्रेमध्ये गेले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते तिथेच राहिले. कुमार यांनी चार तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी काही तामिळ, तेलुगु आणि मल्याळम टीव्ही शोमध्ये पाहुण्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच युक्रेनमधील काही चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.

डॉ. कुमार यांच्या बिबट्याचे नाव ‘यगवार’ आणि ब्लॅक पँथरचे नाव ‘सब्रिना’ आहे. लहानापासून त्यांनी या दोन्ही प्राण्यांचा सांभाळ केला आहे. स्वत: अपत्याप्रमाणे डॉ. कुमार त्यांची काळजी घेतात. 2020 मध्ये एका प्राणिसंग्रहालयातून आजारी असणा-या ‘यगवर’ या बिबट्याला त्यांनी घरी आणले. त्याच्यावर उपचार केले आणि सुदृढ बनवले. तर काही महिन्यांपूर्वीच ‘सब्रिना’ ही मादी ब्लॅक पँथर सापडली.

यगवार, कुमार के पास 19 महीने से है। रेयर ब्रीड्स की संख्या बढ़ाने की मंशा के साथ ही उन्होंने दो महीने पहले ब्लैक पैंथर लिया था।

हाडांचे डॉक्टर कुमार डोनबासमध्ये बिबट्या, ब्लॅक पँथर आणि इटालियन कुत्र्यांसह राहतात. डॉनबास हे युक्रेनचे क्षेत्र आहे जेथे भीषण लढाई सुरू आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात कुमार म्हणाले की, या प्राण्यांच्या काळजीबाबत भारतीय किंवा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अजूनही चर्चाच केलेली नाही. या प्राण्यांचे भारतात पुनर्वसन करणे अवघड काम आहे, कारण यासाठी अनेक ठिकाणांहून मंजुरी आणि इतर व्यवस्था करावी लागणार आहे. जे सध्या कठीण आहे. सध्या माझ्याकडे थोडेथोडकेच खद्यपदार्थ शिल्लक असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Back to top button