गोवा राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता | पुढारी

गोवा राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  हवामान खात्याने शुक्रवार (दि.7) आणि शनिवारी (दि. 8) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शुक्रवार दि. 7 रोजी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 8 एप्रिल दरम्यान कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी वाळपईमध्ये सर्वाधिक 37.1 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. काणकोणमध्ये कमाल 34.3, जुने गोवेत 34.5 तर पणजीत 31.5 अंश सेल्सिअस तापमान होते.

Back to top button