मडगाव रेल्वे स्थानकात सव्वासात लाखांची दारू जप्त | पुढारी

मडगाव रेल्वे स्थानकात सव्वासात लाखांची दारू जप्त

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : मडगाव येथील रेल्वे स्थानकातून परदेशी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला. रेल्वे पोलिस पथकाने ही कारवाई केली. हा पकडलेला सर्व दारूसाठा परदेशी बनावटीचा असून त्याची बाजारातील किंमत ७ लाख २० हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत प्रत्येकी ३६० दारूच्या बाटल्या असलेले १५ बॉक्स जप्त केले आहेत. १५ बॉक्सचे हे पार्सल इतर साहित्य असल्याचे सांगून चोरून आणण्यात येत होते. पण रेल्वे पोलिसांनी अवैध तस्करीचा हा प्रकार उघडकीस आणला आहे. बुधावरी हजरत निजामुद्दीन रेल्वेतून हे पार्सल मडगाव रेल्वेस्थानकात बेकायदेशीररित्या पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मडगाव रेल्वे पोलिसांनी दिली.

Back to top button