गोवा : साडेपाच वर्षांत 385 बलात्कार | पुढारी

गोवा : साडेपाच वर्षांत 385 बलात्कार

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी 2017 ते जून 2022 दरम्यान राज्यात बलात्काराच्या 385 घटनांची नोंद झाली आहे. तर महिलांवरील छळाच्या 999 प्रकरणे पोलिसांत नोंद झाली आहेत. मंगळवारी विधानसभा अधिवेशनात युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तर दिले. या काळात खुनाच्या 178, अमली पदार्थ बाळगण्याच्या 933, चोरीच्या 2692, दरोड्याच्या 13, घरफोडीच्या 738 तर अपहरणाच्या 274 प्रकरणांची नोंद झाली आहे.

राज्यात 2017 साली बलात्कारच्या सर्वाधिक 75 घटनांची नोंद झाली होती. 2020 मध्ये सगळ्यात जास्त 34 खून झाले होते. अमली पदार्थ विरोधी सार्वधिक 222 गुन्हे 2018 मध्ये घडले होते. 2017 मध्ये घरफोडीच्या सार्वधिक 184 घटना घडल्या होत्या. 2021 मध्ये चोरीच्या 566 प्रकरणे नोंदविण्यात आली होती. 2017, 18 आणि 19 मध्ये दरोड्याच्या 3 घटना घडल्या होत्या.

Back to top button