होंडा : अखेर धनगरवाड्यावर पोहोचला रस्ता

होंडा : अखेर धनगरवाड्यावर पोहोचला रस्ता

पुढारी वृत्तसेवा
गेल्या कित्येक वर्षांपासून सावर्डे पंचायत क्षेत्रातील बंदीर धनगरवाड्यात वास्तव करून राहणार्‍या समाज बांधवांना पक्क्या रस्त्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या वाड्याबरोबर काजरेधाट येथील नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते. यासाठी या वाड्यावर रस्त्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिक करीत होते. त्याच प्रमाणे सावर्डे पंचायतीच्या वतीने बर्‍याच वेळा या संबंधी ठराव घेऊन सरकाराकडे पाठवले होते, या मागणीची दखल घेऊन या रस्त्यासंबधी शासकीय पातळीवर सर्व सोपस्कार पूर्ण करून कुमठळ ते बदिंरवाडा पर्यंत रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यासाठी प्रतीक्षा करणार्‍या धनगर समाज बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

नागरिकांत समाधान 

सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघात येणार्‍या सावर्डे पंचायत क्षेत्रातील कुमठळ गावापासून काही अंतरावर असलेल्या बदिंरवाडा तसेच काजरेधाट या दोन्ही वाड्यावर रस्त्याची सोय नव्हती. त्यात हे गाव हे म्हादई अभयारण्याच्या परिसरात येत असल्याने तेथे पक्का रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे गेली कित्येक वर्षे नागरिकांना आलेल्या कच्च्या रस्त्याने प्रवास करून घर गाठावे लागत होते. यामुळे आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्याच प्रमाणे शालेय मुलांना शाळेत ये जा करताना समस्या निर्माण होत होती.

त्यामुळे या दोन्ही वाड्यावर रस्त्याची सोय करावी. यासाठी नागरिकांनी पंचायतीच्या माध्यमातून मागणी लावून धरली होती. त्या मागणीची दखल घेऊन शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान करून या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळवून या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. सध्या बंदिरवाडा ते काजरेधाट गावापर्यंत रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून काजरे धाट ते कुमठळ जंक्शनपर्यंत रस्त्यांचे काम सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news