पुणे : बोगस कर्मचारी भरती प्रकरणी ६२६ कर्मचार्‍यांना घरचा रस्ता; महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : बोगस कर्मचारी भरती प्रकरणी ६२६ कर्मचार्‍यांना घरचा रस्ता; महापालिका आयुक्तांचे आदेश
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा

महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील नियमबाह्य भरती केलेल्या तब्बल 626 कर्मचार्‍यांना अखेर महापालिका प्रशासनाने घरचा रस्ता दाखविला आहे. या कर्मचार्‍यांना सहा महिन्यांचे एकवट एकून वेतन अदा करून त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

हद्दीलगतच्या 23 गावे दि. 30 जुन 2021 रोजी महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार या गावांमधील ग्रामपंचायतीसह तेथील कर्मचारी वर्ग पालिकेच्या आस्थापनेत आला होता. मात्र, पालिकेत येण्यापुर्वी समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कर्मचारी भर्ती झाल्याच्या तक्रारी आल्या जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. महापालिकेच्या मुख्यसभेतही अनेक नगरसेवकांनी बोगस कर्मचारी भरतीबाबत आवाज उठविला होता. त्यावर पालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेत या कर्मचार्‍यांचे वेतन थांबविले होते.

दरम्यान या बोगस भरती प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने या प्रकरणी 14 ग्रामसेवक व 2 कृषी विस्तार अधिकार्‍यांवर ठपका ठेवला होता. तसेच यासंबधीचा अहवाल पालिकेला पाठविला होता. त्यानुसार पालिका आयुक्तांनी समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायतीकडून आलेल्या 626 कर्मचार्‍या कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

गावे आल्यानंतर रेकॉर्ड नुसार कर्मचारी – 1007

– जिल्हा परिषदेने चौकशी केलेले कर्मचारी – 1045
– गावांमधील आकृतीबंधानुसार कर्मचारी – 362
– जिल्हा परिषदेने निर्णय घेतलेले कर्मचारी – 11
– चौकशी अहवालातील नियमवाह्य कर्मचारी – 626
– चौकशीतील नियमबाह्य मात्र, यादीत नाव नसलेले – 46

समाविष्ट गावे – कमी करण्यात आलेले कर्मचारी

1) सुस –  40
2) बावधन बुद्रुक – 55
3) किरकटवाडी – 64
4) कोंढवे- धावडे – 64
5) न्यु कोपरे – 40
6) नांदेड    – 37
7) खडकवासला – 66
8) नर्‍हे           – 85
9) होळकरवाडी – 37
10) औताडे -हांडेवाडी – 28
11) वडाची वाडी – 14
12) नांदोशी- सणसनगर – 19
13) मांगडेवाडी – 36
14) भिलारेवाडी – 15
15) गुजर निंबाळकरवाडी – 34
16) जांभूळवाडी – कोळेवाडी – 45
17) वाघोली – 06

हेही वाचा

व्हिडिओ पहा – Carpool With Arya : अभिनेता शिव ठाकरे बरोबर कोण आहे शिव ची ड्रीम गर्ल ! ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news