कटिंग : देखणे ते चेहरे…  | पुढारी

कटिंग : देखणे ते चेहरे... 

हाय फ्रेंडस्, 

कुछ तो करना है, जिसे देखकर दुनिया भी कह सके ‘इसके जैसा कोई नही’ हे असेकेवळ ठरवून नाही घडत. ‘कुछ करना है’ असे वाटणार्‍यांनी त्यांचा आदर्श घ्यावा जे जीवाची पर्वा न करता कोणाचे तरी जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करत नहीत. कोणाला पाण्यात बुडताना, कोणाला आगीत होरपळताना, कोणाच्या मृतदेहाची हेळसांड होवू नये म्हणून  रक्‍ताळलेले मृतदेहही कवेत घेवून   सुरक्षितता देणारे ते यंगर्स रिअली ब्रेव्हो. एस बॉस,  यांच्यासाठी एक तो लाईक बनती ही है. 

परवा कोल्हापूर नजिक बस पंचगंगेत कोसळल्याचे कळताच अनेक जिगरबाज युवकांनी थंडी,वार्‍याची तमा न करता नदीत उडया घेतल्या. जीव वाचवण्यासाठी जीवघेणी पराकाष्ठा केली. रात्रीच्या अंधारात केवळ बॅटरीच्या प्रकाशात  रक्‍ताळलेले मृतदेह बाहेर काढले.त्यांच्या धाडसामुळेच तीन जीव वाचू शकले. अपघात कोठेही घडो त्या त्या भागातील स्थानिक युवक अक्षरश: जीवाचं रान करून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात.   तिथे ना कोणत्या पक्षासाठी, ना कोणत्या जातीसाठी, ना कोणत्या रक्‍ताच्या नात्यासाठी. तर काळजाला भिडलेली आर्त हाक त्या तरूणांमधील   मदतीची भावना जागवते. 

देखणे ते चेहरे 
जे प्रांजळाचे आरसे
गोरटे की सावळे 
या मोल नाही फारसे 
देखणे ते हात 
ज्यांना निर्मितीचे डोहळे

फ्रेंडस्, कवी   बा. भ. बोरकर यांच्या ‘देखणे ते चेहरे’ या कवितेत अतिशय सुरेख शब्दात ‘देखणे’ कोणास म्हणावे याचे विवेचन केले आहे. बाह्यरूपापेक्षा   व रंगरूपापेक्षाही   अंतर्मनावर देखणेपण ठरावे यावर आधारित ही कविता आहे.‘कोणी कोणास जन्मभर पुरत नाही’ अशी म्हण म्हटली जाते. पण, जन्मात एकदा तरी दुसर्‍याला आयुष्यभर पुरेल असे दान करावे. एकदा तरी दुसर्‍याच्या मदतीला धावावेच, अशी उर्मी या युवकांच्या धाडसाने जागी होते.

कधी खोल पाण्यात, दरीत, कधी अग्‍नीतही उडी घेवून इतरांचे जीव वाचवणारे हे युवक ‘मसिहा’ ठरतायत. अनेकदा अपघातस्थळी नातेवाईकांपेक्षाही धाडसी युवकांची संख्या जास्त असते. कोणाला धिर  देताना, कोणाचे अश्रू पुसताना युवकांचे मदतीचे हात पुढे झालेले दिसतात. 

देखणी ती पाऊले 
जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा 
स्वस्तिपद्मे रेखिती
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा 
अग्‍निचा पेरून जातो
रात्रगर्भी वारसा

सलाम अशा युवकांच्या कर्तृत्वाला!
 

Back to top button