कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हवे नियोजन | पुढारी

कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हवे नियोजन

पुढारी ऑनलाईन

आपली कामे पुर्ण करण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित केली जाते.पण, अनपेक्षितपणे एखादे काम लागते. अनेक कारणांनी कामात अडथळे येतात. त्यामुळे नियोजीत कामाला वेळ लागतो. या विषयावर एका शैक्षणिक संस्थेने 5000 विद्यार्थ्यांवर एक स्टडी केला. या अभ्यासावरून असे लक्षात आले की,कामात अडथळा आणणारे पहिले साधन म्हणजे मोबाईल. तर इतर कारणे म्हणजे गॉसिपिंग, मिटींग, इंटरनेट, इ-मेल्स आणि कलिग्स. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संशोधकांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्समुळे तुमचे काम वेळेत पूर्ण होऊ शकतात. 

yes एखादे काम करायचे ठरवल्यास ते त्याच दिवशी पुर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी पुर्वीच वेळ काढून ठेवा. 

yes समजा एखादे काम तुम्हाला संध्याकाळी 8 पर्यंत पुर्ण करायचे आहे, तर तुमचे टार्गेट 7.30 असले पाहीजे. त्यासाठी टार्गेटच्या आधी एक तास सावध असणे गरजेचे आहे. तेव्हा ठरलेल्या वेळेपुर्वी एक तास आधीचा सिग्नल सेट करून ठेवा, जो तुम्हाला तुमचे काम आत्तापर्यंत पुर्ण झाले पाहीजे, अशी सुचना देत राहील. 

yes वेळेवर काम पुर्ण करण्यासाठी कामाची गती वाढवा. अशाप्रकारे काम करत राहिल्यास तुमच्या कामाच्या प्रोडक्टीवीटीमध्ये नक्कीच सुधारणा होईल.

yes खूप गरजेचे नसेल तोपर्यंत सेल फोन तुमच्याकडून वापरला जाणार नाही, असा नियम स्वत:वर घालून घ्या. प्रत्येक कॉलला उत्तर देण्याची आणि प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याची सवय सोडून द्या. महत्त्वाचे फोन कॉल्स आणि मेसेजेससाठीच्या रिंग टोन्स वेगळ्या ठेवा.

yes एखाद्या कामात व्यस्त असताना काहीवेळेस आपले सहकारीच आपल्याला डिस्टर्ब करतात आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळू शकत नाही. पण, असं जर वारंवार होत असेल तर मात्र हे टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच कामात असताना जर कोणी बोलत बसले तर काम सुरू ठेऊनच त्यांचे बोलणे ऐका आणि त्यांच्याशी बोलताना कामाविषयीच्या गोष्टीच बोलत रहा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळेल की, तुम्हाला काम पुर्ण करणे गरजेचे आहे आणि त्यामुळे परतच्या वेळेस ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत.

yes येणारा प्रत्येक इ-मेल चेक करत बसल्यास पुन्हा कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण जाते. तेव्हा खूप गरजेचे नसतील तर प्रत्येक इ-मेल चेक करत बसू नका. दर दोन तासानंतर इ-मेल चेक करण्यासाठी पाच मिनीटांचा वेळ द्या. त्यावेळेत तुम्हाला महत्त्वाचे इ-मेल्स पाहण्यास मिळतील आणि उरलेले इतरवेळेत चेक करण्यासाठी वेगळे करता येतील.

Image result for time management

Back to top button