व्हिडियो इडिटर अ‍ॅपवर बनवा  लघुपट, गाणी, बेव सिरीज | पुढारी

व्हिडियो इडिटर अ‍ॅपवर बनवा  लघुपट, गाणी, बेव सिरीज

सध्या तरूणाईकडून सोशल मीडिया, फोटो आणि व्हिडियो इडिटिंग या दोन कारणानांसाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. व्हिडियो इडिटिंगमध्ये  सुरवातीला अनेक फोटोज एकत्र करून स्लाईड शो, सुंदर कोलाज बनवण्याकडे अधिक कल दिसायचा. त्याला बॅकग्राऊंडला चित्रपटातील  गाणी दिली जायची. त्यासाठी व्हिवा अ‍ॅप लोकप्रिय होते. त्यानंतर मोबाईलची रॅम,  इंटरनल मेमरी, प्रोसेसरची क्षमता जसं जशी वाढत गेली तसं-तसे फोटो कोलाज बरोबरच अनेक  व्हिडियोे एकत्र करून लहान -लहान चित्रफिती बनवायला सुरवात झाली.

‘व्हिवा व्हिडियोे ’ बरोबरच त्याचवेळी ‘पॉवर डायरेक्टर’ या अ‍ॅपचा बोलबाला राहिला. या ‘पॉवर डायरेक्टर’अ‍ॅपच वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये  व्हिडियो तंतोतंत जोडणे, अनावश्यक  व्हिडियो क्रॉप करणे, दोन  व्हिडियो जोडताना त्यामध्ये ट्रान्सिशन इफेक्ट वापरणे, प्रत्येक  कटला 30 वेगवेगळे सीन इफेक्ट्स देणे आणि 360ि ते 1080ि गुणवत्तेच्या फाईल्समध्ये जतन करणे शक्य झाले. 

याचवेळी वॉटरमार्क न येणारे किंवा ते घालवता येणारे म्हणून ‘व्हिडियो  शो’ हे अ‍ॅप समोर आले. यामधील विविध थीम अधिक उपयुक्त आहेत. 

शिवाय यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी, बुडबुडे, पाऊस, धुके, वीज, ज्वाला, फुलांचा, पानांचा वर्षाव असे अनेक इफेक्ट आहेत. शिवाय वेग कमी-जास्त करणे, रिव्हर्स, व्हिडियो झुम, क्रॉप, टायटल, मल्टी म्युझिक, स्टीकर, आकर्षक थीम, बातमी बनवण्यासाठी उपयुक्त व्हॉईस ओव्हरची सुविधा, जीआयएफ बनवणे, आकार कमी करणे,  व्हिडियो ऑडिओमध्ये बदलणे अशा अनेक सुविधा देणारे अ‍ॅप  युवा वर्गाकडून सध्या वापरले जात आहे. या अ‍ॅपचा वापर करून अनेक  शॉर्ट फिल्म तसेच वेब सिरीजचे एपिसोड बनवले जात आहेत.

यालाही नवीन पर्यायी अ‍ॅप म्हणून ‘काईन मास्टर’ वापर वाढला आहे. यामध्ये अनेक व्हिडियो  एकत्रित जोडत असताना त्याचा प्रिव्हिव्यू  बघायला मिळतो.  या अ‍ॅपचे सर्वात महत्वाचे  वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बॅकग्राऊंड बदलता येते. यामुळे क्रोमा वापरून  व्हिडियोला स्टुडिओ, न्यूज रूमचा फील देता येतो. मात्र यासाठी  व्हिडियो प्लेन बॅकग्रांऊडवर चित्रित करणे आवश्यक आहे. 

– संदीप नाझरे, आमणापूर 

Back to top button