मुलांना फोन घेण्याच्या विचार करताय? ‘हे’ आहेत 5G आणि 4G फिचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन्स! | पुढारी

मुलांना फोन घेण्याच्या विचार करताय? 'हे' आहेत 5G आणि 4G फिचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन्स!

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाची सवय लागली आहे. त्यामुळे ऑनलाईन स्टडीचे महत्त्व विद्यार्थी पालकांमध्ये वाढले आहे. दरम्यान, काही कंपन्यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्यादा फिचर्स असणारी आणि पालकांच्या खिशाला परवडणारे स्वस्तात मोबाईल लाँच केले आहेत. यामध्ये शाओमी, मोटोरोला, रिअलमी, वन प्लस आणि सॅमसंग या कंपन्यांचा समावेश आहे. 

दहावी, बारावी उर्तीर्णांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

Xiaomi Mi 10i 5G

गेल्या महिन्यात म्हणजेच जारेवारीमध्ये भारतात Mi 10i 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला. हा फोन कंपनीचा Mi 10 सीरीजचा लेटेस्ट फोन आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले सोबत १२० हर्ट्ज रिफ्रेश रेज आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ३३ वॅट फास्ट चार्जिंग सोबत 4820mAh बॅटरी आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह या मोबाइल स्क्रीनचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे.

या फोनला को 6GB+128GB आणि 8GB RAM+128GB स्टोरेजसोबत लाँच आहे. फोनला अपर मिड रेंज वैशिष्ट्येसह जसे स्नॅपड्रॅगन ७५० चिपसेट आणि ब्रँड न्यू १०८ मेगापिक्सलचा सेन्सर सोबत लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. 

OnePlus Nord

OnePlus Nord स्मार्टफोन पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. वन प्लसचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. त्याची किंमत कमीत कमी 27,999 रुपये इतकी आहे. या फोनला ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस ऑलमोल्ड डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल इतका आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. वनप्लस नॉर्डमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट दिली आहे. हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड ऑक्सिजन ओएस १०.५ वर काम करतो.

PUBG सोडा, ‘या’ गेमचा जगभरात डंका!

वनप्लस नॉर्डला 6GB RAM+64GB, 8GB RAM+128GB आणि 12GB RAM+256GB स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी यात 4115mAh बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लसचा हा फोन ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. 

Motorola Moto G 5G

मोटोरोलाने भारतात Moto G 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे हा फोन सर्वात कमी किंमतीचा 5G स्मार्टफोन आहे.  या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Moto G 5G मध्ये ६.७ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 चा आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर दिला आहे.

हा फोन 4GB+64GB सह 6GB RAM+128GB स्टारेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये तीन रिअर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच २० वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

प्रेमात पडला आहात? तर मग मेंदूत होणारा केमिकल लोचा जाणून घ्यायलाच हवा

Realme Narzo 30 Pro 5G

हा फोन भारतामध्ये २४ फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 800U 5G प्रोसेसरसह लाँच केला जाईल. Realme Narzo 30 Pro हा स्मार्टफोन TENAA लिस्टिंगवरही स्पॉट झाला आहे. या लिस्टिंगनुसार स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांची स्क्रीन दिली जाईल. सोबतच 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले 120Hz सह सादर केला जाणार आहे. या फोनची नेमकी किंमत किती आहे हे पुढील महिन्यात समजणार आहे.

Samsung Galaxy F62

सॅमसंग कंपनीने या फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy F62 या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिले आहे. फोनमध्ये कंपनीचा एक्सीनॉस 9825 प्रोसेसर दिला आहे. हँडसेटला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

Back to top button