‘कस्तुरी’ सभासदांना विशेष सवलत : नाताळनिमित्त अनोखी संधी | पुढारी

‘कस्तुरी’ सभासदांना विशेष सवलत : नाताळनिमित्त अनोखी संधी

सातारा : प्रतिनिधी

नाताळच्या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ कस्तुरी  क्लबच्यावतीने महिलांसाठी  रविवार दि. 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत मायक्रोव्हेवशिवाय गॅसवर बनवता येणार्‍या ‘केक व चॉकलेट मेकिंग’ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात  असून   यामध्ये विविध प्रकारचे वर्कशॉप  आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश असतो.  दोन दिवसावर नाताळ सण आला असून नाताळातील बच्चे कंपनीचे खास आकर्षण असलेले केक, चॉकलेट्स मायक्रोव्हेवशिवाय गॅसवर महिलांना घरच्याघरी बनवता यावेत यासाठी  ‘दै. पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून ‘केक व चॉकलेट मेकिंग’चे वर्कशॉप आयोजित केले आहे.

संबंधित बातम्या

‘केक व चॉकलेट मेकिंग’ वर्कशॉप रविवारी दुपारी 1 ते 5 या वेळेत  मेसमान मार्केट, शाहूपुरी पोलिस स्टेशनजवळ शाहूपुरी, सातारा येथे होणार आहे. त्यामध्ये  यम्मी केक अ‍ॅण्ड कुकिंग क्लासेसच्या शबाना मेसमान    महिलांना केक व चॉकलेट बनवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. केकमध्ये ब्लॅक फॉरेस्ट, पाईनअ‍ॅपल, स्ट्रॉबेरी फॉरेस्ट आदि प्रकार, चॉकलेट्समध्ये चॉकलेट लॉलिपॉप, विविध आकारातील रोस्टेड आलमंड कॅडबरी, ख्रिसमस स्पेशल चॉकलेट्स घरच्याघरी बनवण्यास शिकवणार आहेत.

घरच्याघरी सहज व सुलभतेने केक व चॉकलेट्स प्रशिक्षण संधीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्येच ‘दै. पुढारी’ कस्तुरी क्लब सभासद नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी  दै. पुढारी कार्यालयात तेजस्विनी बोराटे 8805007192 यांच्याकडे संपर्क साधावा.

Back to top button