दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब केक कार्यशाळेस प्रतिसाद | पुढारी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब केक कार्यशाळेस प्रतिसाद

इस्लामपूर : प्रतिनिधी

ख्रिसमस सणाचे औचित्य साधून आष्ट्यामध्ये दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्यावतीने केक वर्कशॉप घेण्यात आले. या केक कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, यावेळी नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या  कार्यशाळेत बेकिंग, कटिंग, आयसिंगपासून प्लेन केक, सनफ्लॉवर केक, रॅम्बो केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, व्हाईट फॉरेस्ट केक, कप केक आदी विविध प्रकारचे केक तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याचबरोबर केकवर डिझाईन करण्यासाठी विविध नोझल, डिझाईनची माहितीचे प्रात्यक्षिक प्रियांका अमृत शिंदे (पलूस) यांनी  अत्यंत सोप्या व कलात्मक पद्धतीने शिकविले. त्यांनी महिलांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरसन केले.  

यावेळी  आईसिंग केक, डिझायनिंग केक याबाबत महिलांना  टिप्स  देण्यात आल्या. ख्रिसमसनिमित्त  मुलांच्या  हस्ते केक कापून नाताळ  साजरा  केला. क्‍लबच्या वतीने वर्षभर सभासद महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात महिलांसाठी यातून आगळेवेगळे व्यासपीठ निर्माण झाले आहे. कस्तुरी क्‍लबने  राबविलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  मधू देसावळे यांनी संयोजन केले.

संबंधित बातम्या

माजी नगराध्यक्षा झीनत आत्तार, श्रद्धा लांडे, माधुरी पाटील, स्वाती सूर्यवंशी,   ऐश्‍वर्या सूर्यवंशी, वर्षा माने, मनीषा लोखंडे, प्रणोती पवार आदींसह महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Back to top button