स्त्री जन्मा ही…टिकणारे संकल्प | पुढारी | पुढारी

स्त्री जन्मा ही...टिकणारे संकल्प | पुढारी

नूतन वर्ष म्हटलं की, सगळे जण काही ना काही संकल्प करीत असतात. तो केलेला संकल्प बरेचदा  कुणीतरी करतंय म्हणून आपणही करूयात, या गंमतीने ही असतो. तर कुणाकुणाचा संकल्प काही दिवस आठवडा किंवा फारफार तर महिनाभर टिकतो. काहींना तर आपण काही संकल्प केला होता हेही आठवत नाही व ते स्वतःचे हास्य करून घेतात.

तेव्हा या नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी संकल्प केला आहे व ज्यांनी अजून पर्यंत केला नसेल त्यांनी नक्‍की करावा व तो संकल्प पूर्ण करावा. संकल्प खरंच खूप ठरवून केला असल्यास त्याचा तुम्हालाच भरपूर फायदा होत असतो. आता संकल्प नेमका कुठला केला जातो, तर सकाळी चालायला जाणे, वजन कमी करणे इत्यादी. पण मग हे खरंच प्रत्यक्षात का होत नाही. तर आपला संकल्प साधण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी नियमितता असणे गरजेचे आहे. स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे. स्वतःशी प्रामाणिक असणे गरजेचे. स्वतःच्या संकल्पाला प्राथमिकता आपणच देणे आवश्यक आहे.कुठलेही ध्येय गाठायचे म्हंटले तर मुळात ते ध्येय ीशरश्रळीींळल आवाक्यात (साधण्याजोगे) असणं महत्त्वाचं.

मला वाटतं खूप मोठे संकल्प करण्यापेक्षा अगदी छोट्या-छोट्या संकल्पाने सुरुवात करण्यास हरकत नाही. तो संकल्प आपल्या मोठ्या संकल्पाकडे म्हणजेच ध्येयाकडे नेणारा असावा, जसं एखादीने म्हटले मला मेंटल हेल्थ फिट ठेवण्याचा संकल्प करायचा आहे, तर सर्वप्रथम तिने काही अनावश्यक गोष्टींकडे न पटणार्‍या व्यक्‍तींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तिला श्रशीं से करणे शिकायला हवे. दुसर्‍यांच्या वागण्याचा बोलण्याचा स्वतःवर नकारात्मक परिणाम होऊ देता कामा नये. तसेच तिने शेअरिंग करणे महत्त्वाचे आहे.आपली मतं हो नाही मांडता आली पाहिजे इत्यादी. ही झाली छोट्या-छोट्या संकल्पांची यादी. यातील एक-एक गोष्ट तिला तिच्या मुख्य संकल्पाकडे म्हणजेच मेंटली हेल्दी /फिट ठेवण्यासाठी मोठा हातभार लागण्यास मदत होईल.

आपण नेमके याच्या विरुद्ध करतो. मोठा संकल्प ठरवतो. पण, तो गाठायचा कसा हेच समजत नसते व म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं तो केलेला संकल्प फार काळ टिकत नाही

चला तर मैत्रिणींनो, ‘करूया ना मग नवीन वर्षाचा संकल्प!’ आणि ह्या वर्षी तो नक्कीच पूर्ण करूया!

संबंधित बातम्या

Back to top button