भेटवस्तूची निवड | पुढारी | पुढारी

भेटवस्तूची निवड | पुढारी

भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीमुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, परिचित शेजार्‍यांमध्ये एक मजबूत बंध निर्माण होतो, हे तर नक्कीच! आपले प्रेम किंवा स्नेह, जवळीकता बॉन्डिंग दाखविण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात. तेव्हा भेटवस्तूंची निवड कशी करावी, याबद्दल टिप्स या नक्कीच विशेषत: मुली, तरुणी व स्त्रियांना उपयुक्त ठरतील व काही गैरसमजही दूर होतील. 

भेटवस्तू स्नेह वाढावा म्हणून दिल्या जातात. तेव्हा त्यामागील भावना महत्त्वाची असते, त्या वस्तूची किंमत नव्हे! महागड्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत असे नाही. कारण ती तशी देऊन तुम्ही इतरांना कृतज्ञ बनवून घेता किंवा त्या व्यक्तीला तितकीच किमती वस्तू तुम्हाला भेट देण्याची कुवत नसेल, तर त्याला लाजिरवाणे वाटू शकते. महागड्या वस्तू देऊन मोठेपणा अथवा श्रीमंती गाजवू नका. 

भेटवस्तू या स्नेह वृंद्धिगत व्हावा म्हणून दिल्या जातात. त्या घेणार्‍याला तुमचे प्रेम समजून घेता आले पाहिजे. वस्तू स्वस्त असेल तरी उपयोगी, दैनंदिन जीवनात वापरण्योग्य असण्यातून त्यासोबत आठवण जोडली जाईल. 

संबंधित बातम्या

कोणाला भेटवस्तू द्यायची आहे, याचा विचार हवा. शिवाय आपले बजेट किती आहे, हेही लक्षात घ्यावे. विविध प्रकारच्या मेणबत्त्या, दिवे यांचे एक गिफ्ट हॅम्पर बनवून भेट देणं गृहिणी, तरुणी, यांनी इष्ट समजावं. टाईमपीस, फोटो फ्रेम, काचेचे सजावटीचे व किचनमध्ये वापरले जाणारे बाऊन्स ट्रे वगैरे उपयुक्त आहेत. बिस्कीट, ज्यूस पॅकही दर्जेदार कंपन्यांचे उपयुक्त व आवडते ठरू शकतात. मेकअप साहित्यसुद्धा अगदी आवडणारे ठरते. कॉस्मेटिक वस्तूही भेटवस्तू देताना ज्या व्यक्तीला द्यायची आहे; तिची आवड तर लक्षात घ्यावीच, पण बजेट जरा वाढले तर चालत असेल तर ती वस्तू व्यक्तीबरोबरच घर वा कुटुंबासाठीही वापरण्यायोग्य म्हणण्यापेक्षा उपयुक्त ठरणारी असावी. चित्रपटाच्या सीडीज, गाण्याच्या कॅसेट, भजन- भावगीतांच्याही टॅरोकोटा व सिरोमिकजे प्लांटर्सही देणे इष्ट ठरेल.

बर्थ डे, व्हॅलेन्टाईन डे, मदर्स डे वगैरे सारख्या विशेषप्रसंगी आपल्या सदिच्छा, शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. गिफ्ट कार्डही चांगला पर्याय आहे. फुलांचा गुच्छ, बुके हे व प्रेझेंट फिलिंग्स निर्माण करणारे एखादे रोप भेट देणेही संस्मरणीय ठरते. चॉकलेट,  जॅम, जेली, कलर बॉक्स बुक, एज्युकेशनल डीव्हीडी किंवा लहान मुलांसाठी चित्रपटांची व्हीडीओ द्या. थोड्या मोठ्या मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, कंपास, वर्कबुक द्यावे. 

भेटवस्तूंचे अनेक पर्याय आहेत. मार्केट तर वस्तूंनी खचाखच भरलेले आहे. तेव्हा स्त्रियांनी विशेष भेटवस्तू ठरावी अशी निवड करावी. ती वस्तू औचित्यपूर्ण आणि आनंद देणारी असावी. भावना व व्यवहार, किंमत व उपयुक्तता याचा मेळ घालणारी अशी संस्मरणीय, आनंददायी, समाधान देणारी ठरेल; घेणार्‍याला व देणार्‍याला…!  

Back to top button