बहुउद्देशीय आरोग्यसेवक बना | पुढारी | पुढारी

बहुउद्देशीय आरोग्यसेवक बना | पुढारी

समृद्धी पुरंदरे

बदलत्या जीवनशैलीनुसार आरोग्य उत्तम राखणे हे खूप कठीण झाले आहे. खरे पाहता शिक्षणाच्या प्रसाराने बरेच नागरिक आता आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. याकारणामुळे देशातील विविध मोठ्या शहरांत, गावांत आरोग्य सुविधांची मागणी वाढत आहे. अशा केंद्रांमध्ये आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांंची देखील मागणी वेगाने वाढत आहे. आरोग्य क्षेत्रात आवड असलेले उमेदवार या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता. 

दुर्मीळ, दुर्गम भागात राहणार्‍या अनेक व्यक्ती आरोग्य सुविधांच्या अभावाने आपला जीव गमावतात. कारण त्यांना प्राथमिक उपचार सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. अशा असुविधांमुळे जीव गमावणार्‍यांची संख्या खरोखरी अगणित आहे. हे प्रमुख कारण आहे आज गेल्या दोन-चार वर्षांत ‘बहुउद्देशीय आरोग्यसेवक’ (‘मल्टिपर्पज हेल्थ वर्कर ः एमपीएचडब्ल्यू) यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. हे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणार्‍या आरोग्य समस्यांशी त्वरित प्राथमिक इलाज करतात. जिथे रुग्णालये उपलब्ध नसतात, तिथे देखील या कर्मचार्‍यांमुळे आरोग्यसेवा देतात येतात. 

संबंधित बातम्या

‘मल्टिपर्पज हेल्थ वर्कर’चा विचार 1974 मध्ये प्रथम भारतात आला. हे आरोग्यसेवक प्रथम वरिष्ठ डॉक्टरांच्या सोबत सहायक म्हणून काम करतात.  मलेरिया, टीबी, कुष्ठरोग, आगीला बळी पडलेले रुग्ण यांसारख्या इतर संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण करण्यासाठी काम करतात. यासाठी त्या उमेदवाराला या विषयाची पदविका घ्यावी लागते. असे आरोग्यसेवक काही दिवसांपूर्वी उत्तराखंड, चेन्नई, काश्मीर यांसारख्या वेगवेगळ्या भागात आपत्कालीन परिस्थितीत आपली सेवा देताना आपण पाहिले आहेत. 

• आरोग्य सेवकांची जबाबदारी :

या कर्मचार्‍यांची कामाची पद्धत अतिशय वेगळी असते. या व्यक्ती अशा भागात जाऊन काम करतात जिथे डॉक्टर उपलब्ध नसतात. विशेषत: डोगराळ आणि आदिवासी भागात जाऊन तंबू लावून लोकांचे उपचार करतात. आरोग्याशी निगडित त्यांची प्रत्येक गरज ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय महामारीसारख्या रोगांचे नियंत्रण करून संबंधित लोकांना दर्जेदार भोजन पोहोचविण्याचे काम देखील हे कर्मचारी करतात. 

• नोकरीच्या संधी : पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते तरुण उमेदवार सरकारी तसेच निम्न सरकारी विभागात नोकरी मिळवू शकतात. येथे सुपरवायजर, विकास आधिकारी या पदासाठी काम करू शकतात. हरियाणा, छत्तीसगड यांसारख्या राज्यात अशा कर्मचार्‍यांची मोठी मागणी आहे. यामध्ये तरुण आणि तरुणी विशेष करून आरोग्य विभाग, कुटुंब नियोजन विभाग, पर्यावरण विभाग, एनजीओमध्ये नोकरी शोधू शकतात. करिअरच्या सुरुवातीला स्वत:चे क्लिनिक सुरू करू शकतात. 

• वेतन : कोणत्याही एमपीएचडब्ल्यू व्यावसायिकाला सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये वेतन सहज मिळते. 

कोर्स आणि पात्रता : डिप्लोमा इन मल्टिपर्पज हेल्थ वर्करचा कोर्स केल्यानंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी बारावी पास केल्यानंतर करू शकतो. या कोर्स दरम्यान विद्यार्थाला आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सुविधांचे नियोजन आणि सादरीकरण करावे लागते. एखाद्या रुग्णाची सेवा कशा प्रकारे करायची, एखादी साथ पसरल्यानंतर ती कशी नियंत्रणात आणायची, जखमी अवस्थेत त्या रुग्णांना कशी मदत करायची, नेमके काय उपचार करायचे, आपत्कालीन परिस्थितीत लोकांना भोजन साहित्य कसे पोहोचवायचे अशा विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आरोग्यसेवक हे केवळ करिअर नाही तर एक समाजसेवा देखील आहे.

Back to top button