रेल्‍वेत ६२ हजार ९०७ पदांची भरती | पुढारी

रेल्‍वेत ६२ हजार ९०७ पदांची भरती

संकलन : ज्ञानदेव भोपळे

 फेब्रुवारी 2018 रोजी रेल्वे ग्रुप-डी या पदांसाठी 62 हजार 907 पदांची जाहिरात आली असून, ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 12 मार्च 2018 अशी आहे. सर्वसाधारण व ओबीसी वर्गासाठी 500 रु. फॉर्म फी असून इतर वर्गांसाठी 250 रु. फी आहे. मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये एकूण 2321 पदे भरावयाची आहेत. संगणकावर आधारित परीक्षा असणार आहे, 

  • • परीक्षा पद्धत ः वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न. एकूण 100 प्रश्‍न. वेळ 90 मि. नकारात्मक गुण पद्धती 1/3 अशी आहे. परीक्षेचे माध्यम इंग्रजी, हिंदी व मराठी असे असेल. या पदांसाठी वेतन – 18,000 असेल.
  • • अभ्यासक्रम ः गणित, बद्धिमापन, विज्ञान, सामान्यज्ञान व चालू घडामोडी असा अभ्यासक्रम असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण गटातील विद्यार्थी वर्गाला 40% गुण पडणे आवश्यक आहे. इतर वर्गाला 30% गुण पडणे आवश्यक.
  • • शारीरिक चाचणी  : पुरुषवर्गाला – 35 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर दोन मिनिटांत पूर्ण करता यायला हवे. सोबत 1000 मीटर अंतर 4 मिनिटे 15 सेकंदात पूर्ण करावयाचे आहे. एकच संधी असते.
  • • महिला ः- 20 किलो वजन घेऊन 100मीटर अंतर 2 मिनिटामध्ये पूर्ण करावयाचे आहे. 1000 मीटर अंतर 5 मिनिट 40 सेकंदात पूर्व करावयाचे आहे. यानंतर मेडिकल तपासणी घेण्यात येईल. यामध्ये द‍ृष्टी प्राधान्याने तपासली जाते. 
  • • पात्रता ः वयोमर्यादा सर्वसाधारण गटासाठी 18 ते 33 वर्षे.  डउ व डढ वर्गासाठी 5 वर्षे शिथील, जइउ वर्गासाठी 3 वर्षे शिथील. या पदासाठी 10 वी पास उमेदवार फॉर्म भरू शकतो किंवा खढख उमेदवार तसेच समकक्ष असलेला उमेदवार आवश्यक.
  • पदे व त्याची माहिती ः  •  गँगमन/ट्रॅकमन ः सुपरवायझरच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे रुळांची देखभाल व सुरक्षा करणे, अवजड माल व अजवारे नेणे व आणणे, चौकीदारी करणे.
  • • खलाशी व हेल्पर ः खलाशी पदासाठी डिझेल रेल्वे व कार्यस्थळाची सफाई करणे. सुपरवायझर आणि तंत्रज्ञाचा सहायक म्हणून काम करणे. अवजड माल आणणे, उचलणे तसेच डिझेल लोकोमोटिव्ह रोडमध्ये वेगवेगळी कामे करणे.
  • • खलाशी ः रेल्वेरुळावरती उपकरणे आणणे-नेणे संबंधी अकुशल व अर्धकुशल कामे, चौकीदारी करणे, रेल्वेरुळाची रक्षा करणे. सुपरवायझर आणि तंत्रज्ञानाचा सहायक म्हणून काम करणे.
  • • महत्त्वाचे ः परीक्षेचा दर्जा 10 वी वर आधारित असतो. विषयानुसार प्रश्‍नाचे वेटेज नसते. साधारणपणे सामान्यज्ञान व विज्ञानावर 60 ते 70 % प्रश्‍न असतात. बुद्धिमापन व  गणितपर 30 ते 40% प्रश्‍न. परीक्षा प्रादेशिक भाषेतून असल्यामुळे विज्ञान विषयासाठी 4 ते 10 वीची क्रमिक पुस्तके वाचून काढा. सामान्यज्ञानसाठी हिंदीमधून ल्युसेन्ट सामान्यज्ञान किंवा नोबेल सामान्यज्ञान मराठीतून करा. गणितसाठी सायसकराड व बुद्धिमापनसाठी अनिल अंकलगी करा.  यापूर्वी झालेला ग्रुप डीचा रेल्वे प्रश्‍नसंच सोडवा. त्याचा नक्‍कीच फायदा होईल. अधिक माहितीसाठी शिपाई व परिचर महाराष्ट्रातील प्रश्‍नपत्रिका सोडवा. तसेच काही शंका असल्यास .ळप या संकेत स्थळास भेट द्या. शक्यतो श्‍नसंच झालेला हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून घ्या.

   

संबंधित बातम्या

रेल्वे असिस्टंट  लोकोपायलट  आणि टेक्निशन्स -26502

रे ल्वे मंत्रालयाकडून 3 फेब्रुवारी 2018 रोजी वरीलपदासाठी 26,502 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 5 मार्च 2018 पर्यंत असून खुला गटासाठी अर्ज फी 500 रुपये तर इतर वर्गांसाठी 250 रु. आहे. वरील जागांपैकी असिस्टंट लोकोपायलटसाठी 17673 जागा तर टेक्निशियन्स पदांसाठी 8,829 जागा आहेत. परीक्षेची अंदाजे तारखी एप्रिल किंवा मे महिन्यात असेल. 

संगणकावर आधारित टेस्ट (उइढ) ही 75 प्रश्‍नांची असून यासाठी वेळ 60 मिनिटांचा आहे. यामध्ये गणित, बुद्धिमापन, सा. विज्ञान व चालू घडामोडी तसेच सामान्यज्ञान यावर आधारित प्रश्‍न असतील. या परीक्षेत कमीत कमी 42 गुण पडणे आवश्यक आहे. यामध्ये नकारात्मक गुण पद्धती नाही.  वयोमर्यादा खुल्या गटासाठी 18 ते 30 वर्षे, जइउ  साठी 33 वर्षे तर  डउ/डढ वर्गासाठी 38 वर्षे अशी आहे. लोकापायलट या पदासाठी  यातील पदवी किंवा पदविका आणि 12 वी झालेला असावा.

• टेक्निशिन्स पदांसाठी- 12 वी भौतिकशास्त्र आणि गणित हे दोन विषय घेऊन उत्तीर्ण झालेला उमेवार अर्ज करू शकतो. • अभ्यासक्रम व संदर्भ -लोकोपायलट पदासाठी तुमच्या पदवी व पदविकेच्या विषयांचा अभ्यासक्रम यासाठी करपव इेेज्ञ  वाचा. गणित विषयासाठी   अरिहंत प्रकाशन किंवा मराठीतून सतीश वसे, बुद्धिमापनसाठी -सतीश वसे व पंढरीनाथ राणे, सामान्य विज्ञानसाठी -ल्युसिन्ट किंवा अरिहंत प्रकाशनचे पुस्तक सामान्यज्ञानसाठी ल्युसेन्ट किंवा  ेपश श्रळपशी – किरण प्र्रकाशन सोबत झालेले पेपर सोडवा,  चझडउ  किंवा महाराष्ट्र शासनाची जाहिरात नाही म्हणून त्रागा करून घेण्यापेक्षा या संधीचा फायदा उठवा व करिअर घडवा.
 

Back to top button