महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा- 2018 | पुढारी

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा- 2018

– प्रा. जॉर्ज क्रूझ

शा सनाच्या महसूल व वनविभागांच्या संवर्गातील 26 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये सहायक वनसंरक्षक गट-अ साठी एकूण 5 पदे व वनक्षेत्रपाल गट-ब एकूण 21 पदे. अर्ज 4 एप्रिल 2018 पर्यंत सादर करावयाचे आहेत.

• पूर्व परीक्षा 24 जून 2018 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रावरती घेण्यात येणार आहे.
• वेतनश्रेणी – गट अ – 9300-34800 (ग्रेड पे – 5000) भत्ते. गट ब – 9300-34800 (ग्रेड पे – 4,400) भत्ते.

• पात्रता ः भारतीय नागरिक असावा. वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षक 1 जुलै 2018 पर्यंत अमागासवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीयसाठी 43 वर्षे. सहायक वनसंरक्षक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही एका विषयातील वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर असावा.

• वनक्षेत्रपाल पदाकरिता ः वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी,  स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अ‍ॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.

• शारीरिक पात्रता ः

अनुसूचित जमाती व्यतिरिक्‍त अन्य उमेदवारांसाठी महिला ः उंची – 150 सेंमी पेक्षा कमी नसावी.  छाती – पुरुष ः 163 सेंमी पेक्षा कमी नसावी, न फुगवता – 79 सेंमी. फुगवून 5 सेमी वाढली पाहिजे.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी

महिला – उंची – 145 सें.मी. पेक्षा कमी नसावी.
छाती – पुरुष – 152.5 सेमी पेक्षा कमी नसावी – न फुगवता 79 सेमी. – फुगवून 5 सेमी वाढली पाहिजे.
पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे 25 कि.मी. व 14 कि.मी. अंतर 4 तासात पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असावी.

• परीविक्षाधिन कालावधी ः

सहायक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल पदाकरिता प्रोबेशन कालावधी 3 वर्षांचा असेल. निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सदर पदावर किमान 7 वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल.

• परीक्षेचे टप्पे ः पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 400 गुण, मुलाखत 50 गुण.
• पूर्व परीक्षेकरिता शुल्क ः अमागास 374 रु. व मागासवर्गीय 274/- आयोगास अर्ज सादर करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नावाची नोंदणी करणे आवश्यक.

• अभ्यासक्रम व अभ्यास पद्धती ः

पूर्व परीक्षा 100 प्रश्‍न व 100 गुणांची असून कालावधी 1 तासाचा असून प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून प्रश्‍नाचा दर्जा बारावीचा असेल. पूर्व परीक्षेत मराठी, इंग्रजी व सामान्य अध्यायन या घटकांचा समावेश असेल.

• मराठी ः यासाठी संपूर्ण मराठी व्याकरण, मो. रा. वांळिबे तसेच मराठी व्याकरण विद्याभारती प्रकाशन श्रीपाद भागवत सरांचे पुस्तक करा. शपसश्रळीह – ारीींशी ज्ञशू ीें शपसश्रळीह सीरााशी – प्रा. सुरेश वेळापुरे सरांचे तसेच इंग्रजी व्याकरण – एम. जे. शेख सरांचे पुस्तक करा. मराठी व इंग्रजी या विषयाच्या बाळासाहेब शिंदे सरांच्या आयोगाच्या झालेल्या प्रश्‍नपत्रिका सोडवा. मराठी व इंग्रजी सरा वाने समजण्यास मदत होते.

• चालू घडामोडी ः अभिनव प्रकाशनचे वार्षोकी व सकाळ वार्षोकी या पुस्तकांचा वर्षेभराच्या घटनांसाठी नक्‍कीच फायदा होईल व त्यासोबत पृथ्वी परिक्रमा मासिक वाचन चालू ठेवा.

• मानसिक कसोटी चाचणी ः यासाठी गणित व बुद्धीमापन वा. ना. दांडेकर सरांचे व सोबत अभिनव प्रकाशनाचे बुद्धीमत्ता चाचणी हे पुस्तक करा. मुख्य परीक्षा  28 ऑक्टोबर 2018 रोजी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पदांची संख्या फारच कमी आहे. एकूण 26 जागा आहेत. त्यामुळे आपले नाव या जागेत कसे लागेल हाच विचार करा. प्रयत्न तुम्हाला जीवन जगायला शिकवतात तुम्ही परीक्षा देत नसता तुमचीच परीक्षा घेतली जात असते. सकारात्मक राहा व परीक्षेला सामोरे जा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही.
 

Back to top button