‘क्‍लेट 2020’ची तयारी करताना… | पुढारी | पुढारी

‘क्‍लेट 2020’ची तयारी करताना... | पुढारी

‘क्‍लेट 2019’ परीक्षा अलीकडेच यशस्वीपणे घेण्यात आल्या आणि अनेकांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट म्हणून संबोधलेली ‘सीएलएटी’ 2020 ही अखिल भारतीय सामान्य प्रवेश परीक्षा आहे. ही भारताच्या एकोणीस राष्ट्रीय कायदा विद्यापीठांद्वारे रोटेशन तत्त्वावर आयोजित केली जाते. कायद्याच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी याचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या माध्यमातून उपस्थित राहणार्‍या उमेदवारास संपूर्ण भारतातील असंख्य विद्यापीठांत प्रवेश मिळू शकतो. तरीही त्यांच्यापैकी बरेचजण, ज्यांना यात अगोदर अपयश आले होते, त्यांनी त्यांच्या मागील चुका लक्षात घेऊन आपल्या परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढील वर्षी इच्छुकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ही परीक्षा गृहीत धरावी आणि लवकर तयारीला सुरुवात करत सीएलएटी 2020 च्या परीक्षेत यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कायद्याच्या पदवीला अनेक दशकांपासून प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली आहे. या क्षेत्राकडेे विद्यार्थ्यांनी अनुकूल पसंती देण्याचे कारण म्हणजे वाणिज्य किंवा अभियांत्रिकीसारखे अभ्यासक्रम तटस्थ आहेत. पण या अभ्यासक्रमात पुढे, कारकीर्द आणि समाजाच्या द‍ृष्टिकोनातून खूप वाव आहे.

भविष्यातील कायदे आणि कारकिर्दीतील पैलू यासाठी यातली संधी अर्थात यश वाटते तितकेसे सोपे नाही. कायद्याच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यामध्ये भारतातील नामांकित लॉ कॉलेजांसाठीच्या प्रवेश परीक्षेसारख्या द‍ृष्टीने यश मिळवताना  द‍ृढ निश्चय व चिकाटीसह जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. 

विविध संधींसह, कायद्यातील पदवी, पॅरालीगल, हेरगिरी, वकील, न्यायालयीन सेवा, सामाजिक कार्य आणि एमएनसी, बँकांमध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करणे आणि अनुक्रमे स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याच्या द‍ृष्टीने कारकिर्दीची मोठी संधी यातून मिळते. प्रवेश परीक्षा स्पष्ट करण्याचे मूलभूत पाऊल किती महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आधीच समजून घेणे आवश्यक आहे.

म्हणूनच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम हे महत्त्वाचेच ठरते. नुसताच अभ्यास करून यश प्राप्त होते असे नाही. त्यासाठी नियमित सराव आणि नियोजन महत्त्वाचे असते. 

कायद्याच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणे झटकन यश साध्य करण्यासारखे नाही. ऐनवेळी यशाची हुलकावणी देण्यापेक्षा एक वर्षाच्या आधीच तयारी सुरू करणे गरजेचे ठरते. अभ्यासाच्या शेवटच्या क्षणाला वेळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण होतो ज्यामुळे प्रवेश परीक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच खूप उशीर होण्यापूर्वी तयारी वेळेवरच सुरू करणे फार महत्त्वाचे आहे. कायदा प्रवेश परीक्षा (क्‍लेट)आता ऑफलाईन आहे. 

पेपरमधील प्रमुख विभाग आहेत.

अ. सामान्य ज्ञान,

ब. कायदेशीर योग्यता,

क. इंग्रजी,

ड. लॉजिकल रिझनिंग, 

ई. गणित.

प्रवेश परीक्षेला सामोरे जाताना काही उणिवा काढून टाकणे गरजेचे ठरते. 

1) वेळेचे व्यवस्थापन : विद्यार्थ्याने 12 वीच्या बोर्ड परीक्षेवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रवेश परीक्षेची संपूर्ण तयारी करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्याने दोन परीक्षांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. गुणांच्या आधारे प्रवेश मिळविण्याबरोबरच प्रवेश परीक्षेद्वारे प्राथमिक शैक्षणिक संस्थेत शिकण्याच्या संधीचा पर्याय उपलब्ध होतो.

2) लक्ष : सर्वसाधारणपणे बहुतेक प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यात घेतल्या जातात. ही परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतरच होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयार करण्यासाठी कमी वेळ मिळतो. म्हणूनच बोर्ड परीक्षेच्या तयारीबरोबरच लक्षपूर्वक प्रवेश परीक्षेचीही तयारी करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी नियोजनाचा टप्पा महत्त्वाचा ठरतो.

3) नियमित सराव : विद्यार्थ्यांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील परीक्षेतील प्रश्नांच्या स्वरूपाची कल्पना जाणून घेण्यासाठी मागील वर्षाचे पेपर सोडवणे आणि कमी वेळेत अचूक पेपर सोडवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करणे महत्त्वाचे असते. यात नियमित मॉक टेस्ट देणे समाविष्ट असते. उदाहरणार्थ, परीक्षेचा कायदा पात्रता विभाग विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा करतो की क्‍लिष्ट कायदेशीर तर्कविषयक समस्या सोडवता आल्या पाहिजेत तसेच गेल्या एक वर्षाच्या सर्व महत्त्वपूर्ण कायदेशीर बाबी परीक्षार्थीने जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणूनच मनाची तयारी लवकर करणे उमेदवारासाठी फायदेशीर ठरू शकते. माती ओली असतानाच त्याला आकार देता येतो, नंतर नाही, हे लक्षात घ्यावे.

4) नियोजन : सुरुवातीच्या टप्प्यात अभ्यासक्रम हा कठीण दिसतो परंतु जेव्हा तो नियोजनबद्ध आणि अचूकपणे केला जातो, तेव्हा तो समजण्यास अधिक सुलभ होतो. असे म्हटले जाते की, सातत्यपूर्ण प्रयत्न नेहमी आपला आत्मविश्वास वाढवितात. अशा परीक्षांच्या तयारीसाठी दररोज कमीतकमी काही तासांचा सराव निश्‍चितच करावा लागतो. त्यासाठी काटेकोर वेळापत्रक तयार करावे लागते.

विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढवायला हवा. म्हणी वाक्प्रचार, प्रसिद्ध वचने नियमित लक्षात ठेवायला हवीत. चाल ूघडामोडींवर बारीक नजर ठेवून सतत त्याचे आकलन करायला हवे. यामुळे अभ्यासात नवऊर्जा तयार होते.

Back to top button