लाइव्ह स्ट्रिमिंगवर पैसे कमवा | पुढारी | पुढारी

लाइव्ह स्ट्रिमिंगवर पैसे कमवा | पुढारी

अनिल विद्याधर

देशातील अनेक क्रिएटर्स यूट्यूबवर आता व्हिडीओ गेम्सचे लाईव्ह स्ट्रिमिंग करत आहेत. त्यातून बर्‍यापैकी पैसा कमवत आहेत. आजघडीला यूट्यूबवर 24 गेमिंग चॅनल्स असून त्याचे दहा लाख सबस्क्रायबर्स आहेत. दररोज वीस कोटींपेक्षा अधिक श्रोते यूट्यूबवर गेमिंग व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग पाहतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लाईव्ह गेमिंग स्ट्रीमिंगमध्ये 75 टक्के वाढ झाली आहे. आशिया-पॅसेफिक विभागात भारताचा गेमिंग मार्केटमध्ये तिसरा क्रमांक लागतो. 

मुंबईत राहणारी 21 वर्षीय मनस्वी दळवी ही कायद्याचा अभ्यास करत आहे. ती एका दिवसात आठ तास व्हिडीओ गेम खेळते आणि त्यास लाईव्ह स्ट्रिम करते. याप्रमाणे तिने गेल्यावर्षी एक लाखांची कमाई केली. हे पैसे तिला फॅन्सचे डोनेशन आणि ब्रँडस्च्या जाहिरातीच्या माध्यमातून  मिळाले आहेत. याप्रमाणे चेन्नईत राहणारा प्रभाकरन पी. देखील गेम्सची लाईव्ह स्ट्रिमिंग करतो. यासाठी त्याने अ‍ॅमेझोनची नोकरी सोडली. ई-कॉमर्समधून जेवढा पैसा कमवत होतो, तेवढा पैसा गेम्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमधून कमवू शकतो, असा त्याला विश्वास आहे. मनस्वी आणि प्रभाकरन हे देशातील बदलत्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. ही मंडळी यूट्यूबवर गेम्सची लाईव्ह स्ट्रिमिंगला करिअर म्हणून निवडत आहेत. यूट्यूबच्या विशेष फिचरच्या मदतीने गेमिंगचे लाइव्ह स्ट्रिमिंग हा करिअरसाठी चांगला पर्याय बनला आहे. 

गेमिंगला विशेष वलय :

दोन वर्षांपूर्वी भारतात गेमिंग चॅनेल असून नसल्यासारखे होते. आता दहा लाख सबस्क्रायबर असलेले चोवीस गेमिंग चॅनेल आहेत. त्याचे भारतातील युवकांकडून संचलन होत आहे. देशात आता वेगवेगळ्या भाषेत गेमिंग क्रिएटर्स येत आहेत. व्हिडीओ श्रेणी असलेल्या यूट्यूबचा बाजारात चीनच्या टिकटॉकने मुसंडी मारली आहे. अशा स्थितीत गेमिंग हे व्हर्टिकल यूट्यूबसाठी उपयुक्त ठरत आहे. 

ट्रेंड वाढणार

सध्याच्या काळात युवकांत लाईव्ह गेमिंगची क्रेझ वाढली आहे. हजारो यूट्यूब चॅनेल गेमिंगला स्ट्रिम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून देशात इंटरनेटचा वेग वाढल्याने लाईव्ह गेम पाहण्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज सुमारे 20 कोटींहून अधिक श्रोते यूट्यूबवर गेमिंग व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रिम पाहतात. आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

गेमिंगची लोकप्रियता :

भारतातील बहुतांश नागरिक हे मोबाईलवरच गेमिंग खेळण्यास प्राधान्य देतात. तर दुसर्‍या देशात गेम्स खेळण्यासाठी कॉम्प्यूटर आणि कन्सोलला अधिक महत्त्व देतात. सद्यस्थितीत यूट्यूब हे भारतीय गेमर्सला कंटेट स्ट्रॅटजी, प्रॉडक्शन डिझाईन, ग्रीन स्क्रिनचा वापर कसा करावा आणि कॅमेरा, लाईट आणि एडिटिंगचे प्रशिक्षण देत आहेत. याप्रमाणे प्रशिक्षण मिळाल्याने गेमिंग क्रिएटर्स हे यूट्यूबवर चांगल्यारितीने काम करत आहेत. 

यूट्यूब हे अनेक व्हर्टिकल काम करत आहे. यूट्यूबवर विविध प्रकारचा कंटेट असतो. यापैकीच गेमिंग हा एक लोकप्रिय कंटेट मानला जातो. यूट्यूब हा आगामी काळात गेमिंग कम्युनिटीला अधिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

गेमरच्या व्हिडीओला यूजर हे बराच काळ पाहतात आणि वारंवार पाहतात. या आधारावर यूट्यूबला भारतीय बाजारात टिकून राहण्यासाठी मदत मिळते.

Back to top button