'औषधे आणि आपण' विषयावर मिडास इन्स्टिट्यूटकडून विशेष कार्यशाळेचे आयोजन | पुढारी

'औषधे आणि आपण' विषयावर मिडास इन्स्टिट्यूटकडून विशेष कार्यशाळेचे आयोजन

औषधाचा जन्म कसा होतो? औषधे आणि त्यांचे साईड इफेक्ट्स? ऍलोपथी, होमिओपॅथी का आयुर्वेद? ड्रग आणि अन्न यांचा परस्परसंबंध काय आहे? ड्रगचे डोस आणि स्टोरेज कसे असते? ड्रग नक्की काम कसा करतो? अँटी बायोटिकचा गैरवापर कसा थांबवावा? याविषयी आपल्या मनामध्ये अनेक शंका, प्रश्न असतात. याविषयी सविस्तर माहिती घेऊन वेळेत व योग्य उपचार घेतल्यास आपण रोगराईला परावृत्त करू शकतो. त्यामुळे औषधाबद्दलच्या सर्व शंका दूर करणारा व आपल्याला औषध साक्षर बनवणारा ‘औषधें आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. मृदुला बेळे यांचे कार्यशाळेला मार्गदर्शन लाभणार आहे . 

रविवार दिनांक २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी www.midasinstitute.com ला भेट द्या. या कोर्सची फी ७००/- रुपये असून सवलतीतील फी ५०० रुपये आहे. (सवलत फक्त पहिल्या काही रजिस्ट्रेशन्ससाठी औषधाबद्दल सर्व शंका दूर करणारी आणि आपल्याला औषध साक्षर बनवणारी प्रा. मृदुला बेळे यांची कोरोना काळातील हा विशेष कार्यशाळा आहे. कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे . 

Back to top button