फूड टेक्नॉलॉजीमधील विविध करिअर संधी | पुढारी

फूड टेक्नॉलॉजीमधील विविध करिअर संधी

डॉ. ए. के. साहू

फूड टेक्नॉलॉजी हे कुकिंग अभ्यासक्रम किंवा हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम नसून सायन्स, इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी यांचे सर्वोत्तम मिश्रण आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड इंजिनिअरिंग, फूड केमिस्ट्री, फूड प्रिजर्वेशन, फूड प्रोसेसिंग, फूड माईक्रोबायोलॉजी, फूड पॅकेजिंग, ह्यूमन न्यूट्रिशन, फूड क्‍वालिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंट, मार्केटिंग व उद्योजकता विकास इत्यादी सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. 

फूड इंजिनिअरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे हीट ट्रान्स्फर फ्लूईड मेकॅनिक्स, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, प्रोसेस इंस्ट्रूमेंटेशन डायनॅमिक्स अँड कंट्रोल, प्रोसेस इक्‍विपमेंट डिझाईन अँड ड्रॉईंग असे जवळजवळ सर्व महत्त्वाचे विषय घेतले जातात. तसेच फ्रूट अ‍ॅडवेजिटेबल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, शुगर अँड कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी ऑफ सीरिअल अँड बेकरी प्रोडक्टस्, मीट-पोल्ट्री अँड फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी व आईलसीड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यासारखे विविध विषय फूड टेक्नॉलॉजीमध्ये घेतले जातात. 

फूड केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक अन्‍नामधील कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे व क्षार/खनिजे अशा विविध घटकांचे महत्त्व व त्यांची दैनंदिन गरज तसेच विविध रासायनिक अभिक्रियेतील त्यांचे स्थान, याबद्दल माहिती दिली जाते. तसेच फूड माईक्रोबायोलॉजीमध्ये हानिकारक मायक्रोओर्गानिस्ममुळे होणारी अन्‍न विषबाधा, त्यांच्यापासून अन्‍नपदार्थांचे संरक्षण कसे करायचे तसेच चांगल्या मायक्रोओर्गानिस्मचा फूड उत्पादनासाठी कसा वापर करायचा, हे सांगितले जाते. फूड बायोकेमिस्ट्रीमध्ये अन्‍न घटकांच्या आधुनिक रसायन आणि जैवरासायनिक विश्‍लेषणात्मक पद्धतीचा वापर कसा करायचा ते सांगितले जाते. फूड पॅकेजिंगमध्ये नैसर्गिक तसेच कृत्रिम गोष्टीचा वापर करून अन्‍नपदार्थ जास्त काळ कसे टिकवायचे तसेच ग्राहकाला पॅकेजिंगचा वापर करून आकर्षित करायचे या संदर्भात माहिती दिली जाते. तसेच ह्युमन न्यूट्रिशन न्यूटिशनमध्ये लहान मुले, किशोरवयीन मुले, तरुण, वयोवृद्ध माणसे, गरोदर स्त्रिया आणि क्रीडापटू यांची गरज व यांचे आजार लक्षात घेऊन विविध घटकांचा वापर करून त्यांच्या गरजेनुसार कोणते व कसे अन्‍नपदार्थ बनवायचे ते शिकवले जाते. 

फूड क्‍वालिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये अन्‍नाची गुणवत्ता आणि सुरक्षा हमीसाठी कोणकोणते संयोजन करायला पाहिजे ते शिकवले जाते. विद्यार्थ्यांना उद्योजकाचा हेतू बळकट करण्यासाठी आणि त्याच्या उद्योजकाची भूमिक प्रभावीपणे बजावण्याकरिता आवश्यक कौशल्ये आणि क्षमता आत्मसात करण्याकरिता मदत करण्यासाठी उद्योजकता विकास  अभ्यासक्रमाचा समावेश केलेला असतो.

Back to top button