फायदे जिवंत कुंपणाचे | पुढारी

फायदे जिवंत कुंपणाचे

महाराष्ट्रात मोकाट गुरांच्या भीतीने आज बरेचसे क्षेत्र लागवडीलायक असताना लागवडीशिवाय राहिले आहे.रोपे उपटून नेणे, फळबागेतील फळे चोरणे, शेतीचे साहित्य चोरणे आदी प्रकार शेतर्‍यांच्या बाबतीत घडत असतात. यावर उपाय म्हणून काही सधन शेतकरी शेतीला कायम स्वरूपाचे कुंपण करतात, तर सर्वसामान्य शेतकरी तातपुरत्या स्वरूपाचे कुंपण करतात. काही शेतकर्‍यांना तर शेतीचे आर्थिक गणित न जमल्यामुळे ते शेतीच्या कुंपणाचा अजिबात विचार करू शकत नाहीत. कारण, चांगल्या प्रकारच्या कुंपणाचा खर्च सामान्य शेतकर्‍याला परवडणारा नसतो, याला आता संजीव कुंपणाचा ठोस पर्याय समोर आला आहे. यालाच काही ठिकाणी जिवंत कुंपण असे म्हटले जाते.

सजीव कुंपणाचे कमी खर्चात, जास्त काळ टिकणारे आणि भक्कम कुंपण तयार करता येते. शिवाय या कुंपणापासून जळाऊ लाकूड, औषध उपयोगी बाबी आणि ऊर्जा मिळते. या कुंपणाची शेताच्या चारही बाजूंनी लागवड केल्यास पिकांचे वारे, वादळ आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण होते. जमिनीची धूप थांबते आणि वनीकरणाच्या कामास हातभार लागून नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होते.

सजीव कुंपणाचे कमी खर्चात जास्त काळ टिकणारे आणि भक्कम कुंपण तयार करता येते. शिवाय या कुंपणापासून जळाऊ लाकूड, औषध उपयोगी बाबी आणि ऊर्जा मिळते. या कुंपणाची शेताच्या चारही बाजूंनी लागवड केल्यास पिकांचे वारे, वादळ आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण होते. जमिनीची धूप थांबते आणि वनीकरणाच्या कामास हातभार लागून नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होते.

सजीव कुंपणासाठी वनस्पती निवडताना काही बाबींचा विचार करणे आवश्यक असते. कारण सजीव कुंपणासाठी लावण्यात येणार्‍या वनस्पती जलद वाढणार्‍या, शक्यतो काटेरी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणार्‍या असाव्यात आणि गुरांना खाण्यासाठी निरुपयोगी असाव्यात. त्यांच्यावर लागवडीनंतर होणारा देखभालीचा खर्च कमीतकमी असावा. सजीव कुंपणासाठी केतकी (अगेव्ह), बांबू, मेहंदी, बेशरम, खैर, शिकेकाई, घायपात, बेगनव्हिला, ऑस्ट्रेलियन बाभूळ, काटेरी बाभूळ, निलगिरी, सागरगोटा, करवंद, मोगली एरंड, चिलार, तोरणी, निवडूंग, गिरीपुष्प, घाणेरी, कडूमेंदी, अडुळसा या योग्य वनस्पती आहेत.

– किर्ती कदम 

Back to top button