खत व्यवस्थापन : खतांमधील ओळखा भेसळ | पुढारी

खत व्यवस्थापन : खतांमधील ओळखा भेसळ

अलीकडील काळात भेसळखोरीला उधाण आले आहे. दुधातील भेसळीबाबत आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. बियाणांमध्येही नकली, निकृष्ट दर्जाचे बियाणे दिले गेल्याचे दिसून आले आहे, पण खतांमध्येही भेसळ केली जाते, हे अनेक शेतकर्‍यांना माहीत नसते. अशा भेसळयुक्त खतांमुळे अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत.

शेतकरी खते मोठ्या विश्वासाने विकत घेत असतात; त्यांची मात्राही भरपूर देतात, पण त्याचा पिकांना फायदाच होत नाही. कारण त्यामध्ये भेसळ केलेली असते. अशी भेसळ कशी ओळखायची, याविषयी.

सिंगल सुपर फॉस्फेट 16 टक्के (एस. एस. पी) ः 1 ग्रॅ्रम खतात 10 मि. लि. पाणी टाकून चांगल्या प्रकारे हलविणे असता पुष्कळसा एस. एस. पी. विरघळतो; परंतु काही न विरघळणारे पदार्थ तरंगल्यास खत कमी प्रतीचे आहे असे समजावे.

म्युरेट ऑफ पोटॅश 60 टक्के (एम. ओ. पी) ः हे खत जळणार्‍या ज्योतीवर टाकल्यास ज्योतीचा रंग पिवळा होतो. युरियाप्रमाणे यानेही गारवा जाणवतो.

कॅल्शियम अमोनियम नायट्रेट 25 टक्के नत्र (सी.ए.एन) ः हे खत परीक्षण नलिकेत घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाकले असता बुडबुडे येतात.
कोणतेही खत मग त्याचा रंग कोणताही असो तो कधी आपल्या हाताला लागत नाही जर रंग हाताला लागला असेल तर ते खत भेसळयुक्त आहे असे समजावे.
– जगदीश काळे 

 

Back to top button