Stock Market Updates | सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी कमावले ५ लाख कोटी, ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी कमावले ५ लाख कोटी, 'हे' घटक ठरले महत्त्वाचे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे जूनमध्ये व्याजदर कपातीची आशा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ७५० अंकांनी वाढून ७२,८६० वर पोहोचला. तर निफ्टी २२ हजारांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने २२ हजारांवर व्यवहार सुरु केला आहे. आयटी, मेटल सरकारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. एकूणच सर्वच क्षेत्रात चौफेर खरेदी सुरु आहे.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बाजारातील सुरुवातीच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.४१ लाख कोटी रुपयांनी वाढून ३७९.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्सवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर मारुती, नेस्ले शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. (Stock Market Updates)

sensex updates

निफ्टीवर बीपीसीएल, टाटा स्टील, हिंदाल्को, एनटीपीसी, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर अपोलो हॉस्पिटल, मारुती, नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डी या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.

आयटी शेअर्स तेजीत

आयटी शेअर्समधील तेजीमुळे गुरुवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीही वाढले. यूएस फेडरल रिझर्व्हने या वर्षी तीन दर कपातीचा अंदाज कायम ठेवल्यानंतर जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. या वर्षी तीन व्याजदर कपातीच्या फेडच्या अंदाजानंतर, LTTS, Coforge, Wipro आणि HCL Tech यांच्या नेतृत्वाखाली निफ्टी IT ने सुमारे १ टक्क्याने उसळी घेतली.

यूएस फेडचा निर्णय

यूएस फेडने अपेक्षेप्रमाणे ५.२५ टक्के आणि ५.५ टक्क्यांदरम्यान व्याजदर कायम ठेवला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. याचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद दिसून येत आहे.

जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण

आशियाई बाजारातील निर्देशांकांनी आज उसळी घेतली. जपानच्या निक्केईने विक्रमी उच्चांक गाठला. फेडरल रिझर्व्हने असे सूचित केले आहे की ते व्याजदरात कपात करण्याच्या गोष्टीवर कायम राहतील. MSCI च्या जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक १.६ टक्क्यांनी वाढला. अमेरिकेच्या शेअर बाजारातील S&P 500 निर्देशांक उच्चांकी पातळीवर काल बंद झाला. 

हे ही वाचा :

Back to top button