अर्थज्ञान : डाक निर्यात केंद्र आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुवर्णसंधी | पुढारी

अर्थज्ञान : डाक निर्यात केंद्र आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुवर्णसंधी

सौरभ ढमणगे

सध्या प्रत्येक जिल्ह्यात डाक निर्यात केंद्रे ठराविक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून याच्या माध्यमातून 198 देशांमध्ये उत्पादने पाठवण्याची सोय उपलब्ध केली आहे. निर्यात केंद्रात आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल, स्मॉल पॅकेज, आयटीपीएस इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल मार्फत 30 किलोपर्यंत वजन पाठवणे तसेच 1 लाख रुपयेपर्यंतचा विमादेखील काढण्याची सोय आहे. ( Postal Export Centers )

जवळपास एक लाख पंचावन्न हजारांहून अधिक पोस्ट ऑफिसचे जाळे देशभरात पसरलेले आहे. पोस्टमन आणि रिकरिंग खाते एवढीच स्वतःची ओळख न ठेवता पोस्ट विभागाने गेल्या काही वर्षांत कात टाकली असल्याचे दिसून येत आहे. आईपीपीबीद्वारे बँकिग सेवा, टपाल जीवन विमा, पासपोर्ट सेवा, आधार सेवा अशा अनेक केंद्र सरकारी योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक वर्षे भारतीय टपाल खाते करते.

Postal Export Centers : उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सहज उपलब्ध

डाक विभागाने देशांतार्गत सुविधेबरोबरच उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सहज उपलब्ध करून दिलेली आहे. “डाक निर्यात केंद्र” यांच्या माध्यमातून लहान-मोठ्या उद्योजक कारागीर यांना अगदी कमीत कमी रक्कमेकध्ये आपली उत्पादने परदेशात पाठवणे सुलभ झाले आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात डाक निर्यात के्रंद्रे ठराविक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. या डाक निर्यात केंद्राच्या माध्यमातून 198 देशांमध्ये उत्पादने पाठवण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. डाक निर्यात केंद्रात आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल, स्मॉल पॅकेज, आयटीपीएस इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल मार्फत 30 किलोपर्यंत वजन पाठवणे तसेच 1 लाख रुपयेपर्यंतचा विमादेखील काढण्याची सोय उपलब्ध आहे. सदर सर्व ऑनलाईन प्रणाली असून उद्योजकांना घरातून, ऑफिसमधून तसेच कारखान्यातून अथवा कामाच्या ठिकाणाहून आपले पार्सल बुकिंग करता येते. प्रत्येक युजरला स्वःत नोंदणी करून त्यातूनच बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक देशाचे दर वेगवेगळे आकारले जात असल्यामुळे युजरना आपल्या पोर्टलमधेच दराची माहिती मिळते.

डाक निर्यात केंद्रात कस्टम क्लिअरन्स् ऑनलाईन

बुकिंग झाल्यानंतर केवळ पाठवण्यासाठीच पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. त्यामुळे रांगेत थांबून बुकिंग होईपर्यंत वाट बघण्याची गरज पडत नाही. यापूर्वी व्यापार्‍यांना कस्टम विभागातील त्रुटींचा सामना करावा लागत असल्याने परदेशात माल पोहोचण्यास विलंब होत असे. परंतु डाक निर्यात केंद्रात कस्टम क्लिअरन्स् ऑनलाईन प्रणालीमुळे अगदी कमी वेळेत माल परदेशात पोहोचतो. या प्रणालीत पोस्टल बिल निर्यात कस्टम क्लिअरन्स् ऑनलाईन प्रणालीमुळे अगदी कमी वेळेत माल परदेशात पोहोचतो. या प्रणालीत पोस्टल बिल निर्यात (पीबीई) देखील ऑनलाईन उपलब्ध होते. ही सर्व प्रणाली युजर फ्रेंडली आहे. उद्योजकांना खासगी कुरियरच्या खर्चिक सेवेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे जागतिक बाजारपेठ उत्पादनांची मागणी असूनही सहभागी होणे शक्य होत नव्हते. डाक निर्यात केंद्रामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजक, कुशल कारागीर यांनादेखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सहज उपलब्ध झालेली आहे.

डाक निर्यात केंद्राच्या नोंदणीसाठी केवळ आयातक-निर्यातक कोड, वस्तू-सेवा कर नंबर केवायसी कागदपत्रे आवश्यक असून ती परकीय व्यापार महासंचनालय भारत सरकार (डीजीएफटी) कडून सहज ऑनलाईन उपलब्ध करून दिली जातात. सद्य:स्थितीत डाक विभागात 122 डाक निर्यात केंद्रे कार्यान्वित असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढवली जात आहेत. मे 2023 अखेर 814 उद्योजक जोडले गेले आहेत.

Back to top button