Stock Market Closing Bell | बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी लाल चिन्हात बंद, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग? | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी लाल चिन्हात बंद, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग?

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी अस्थिरता दिसून आली. बाजारातील अस्थिरतेत सेन्सेक्स आणि निफ्टी आज खाली येऊन बंद झाले. सेन्सेक्स ६८ अंकांनी घसरून ६६,४५९ वर बंद झाला. तर निफ्टी २० अंकांच्या घसरणीसह १९,७३३ वर स्थिरावला. क्षेत्रीयमध्ये रियल्टी निर्देशांक सुमारे २ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला, तर आयटी निर्देशांक १ टक्के आणि मेटल निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.५ टक्क्यांची वाढ झाली. (Stock Market Closing Bell)

निफ्टीवर कोल इंडिया, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीस हे टॉप गेनर्स राहिले. तर पॉवर ग्रिड, हिरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल्स, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्स आज ६६,५३२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,६५८ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एम अँड एम, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स वधारले. तर पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, इंडसइंड बँक, एसबीआय, रिलायन्स, मारुती, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले.

या आर्थिक वर्षाच्या (FY24) पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५१ टक्के वाढून ३२३ कोटींवर गेल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. (Stock Market Closing Bell)

हिरो मोटोकॉर्पला फटका

मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल (Hero Motocorp Executive Chairman Pawan Munjal) यांचे निवासस्थान आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकल्याचे वृत्त समोर आले. या घडामोडीमुळे कंपनीच्या शेअर्सला फटका बसला. दुपारच्या सत्रात कंपनीचा शेअर ४.४ टक्क्यांनी घसरून ३,०६३ रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर आला होता. त्यानंतर हा शेअर ३,१०० रुपयांवर स्थिरावला.

जुलैमध्ये राहिला परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ

परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सलग पाच महिने भारतीय शेअर्स खरेदीवर जोर दिला. यामुळे बेंचमार्क निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे. जुलैमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) ४६,६१८ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले.

दरम्यान, आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्केई निर्देशांक यांनी वाढून व्यवहार केला.

हे ही वाचा ;

Back to top button