Stock Market : शेअर बाजाराची सुरुवात ‘लाल’ दिव्यांनी; कसा असेल मार्केटचा आजचा ‘मूड’? | पुढारी

Stock Market : शेअर बाजाराची सुरुवात 'लाल' दिव्यांनी; कसा असेल मार्केटचा आजचा 'मूड'?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज नकारात्मक लाल दिव्यांनी झाली. निफ्टी 50 अंकांनी घसरला तर सेन्सेक्सही घसरून 116.52 अंकावर खाली आला. तर बँक निफ्टी देखील 95.05 अंक घसरून खाली आला आहे. निफ्टीवर नकारात्मक परिस्थितीतही निफ्टीवर ऑटो, एफएमसीजी, आयटी आणि फार्मा क्षेत्र वधारलेले होते नकारात्मक सुरुवातीनंतर हळूहळू निफ्टी आणि सेन्सेक्स वर आला. सव्वा दहाच्या सुमारास निफ्टीने 18750 अंकांने तर सेन्सेक्सने 30 अंकांनी उडी घेतली. बँक निफ्टी मात्र 43950 अंकाच्या खालीच संघर्ष करत होता.

Stock Market : सकाळच्या सत्रातील टॉप गेनर्स आणि लूजर्स

निफ्टी 50 वर डिव्हिस लॅब, अदानी एंटरप्रायझेस, ब्रिटानिया, सिप्ला आणि नेस्ले इंडिया हे सर्वाधिक वाढले तर इंडसइंड बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ, ओएनजीसी आणि हिंदाल्को यांना तोटा झाला.

Stock Market : बँक निफ्टीवरील टॉप गेनर्स आणि लूजर्स

बँक निफ्टी 95.05 अंकांनी किंवा 0.22% घसरून 43,892.95 वर आला. सर्वाधिक नुकसान इंडसइंड बँक, बंधन बँक, एयू बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि बँक ऑफ बडोदा होते. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अॅक्सिस बँकेच्या शेअर्सची घसरण

खाजगी इक्विटी प्रमुख बेन त्यांच्या 1.3% स्टेकसाठी सुमारे $267 दशलक्ष मिळवून, अॅक्सिस बँकेतील आपला स्टेक ऑफलोड करेल, असे अहवाल दिल्यानंतर अॅक्सिस बँकेच्या शेअरची किंमत 0.2% घसरून 975.85 रुपये झाली.

SJVN चे शेअर्स जवळपास 2% वाढले

राज्यातील 5,000 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी कंपनीने महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्यानंतर SJVN शेअरची किंमत 1.71% वाढून 39.10 रुपये झाली.

दिलीप बिल्डकॉनच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी वाढ

शेअर बाजारात आज दिलीप बिल्डकॉनच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीने त्याच्या उपकंपनी DBL चंडीखोल भद्रक हायवेजने “पुनर्वसन आणि चंडीखोले-भद्रकच्या सहा-लेनिंग टू अपग्रेडेशनचा प्रकल्प पूर्ण केल्याची घोषणा केली. त्यानंतर दिलीप बिल्डकॉनच्या शेअरची किंमत 4.91% वाढून 237.25 रुपये झाली.

हे ही वाचा :

Stock Market : बाजाराची सुरुवात सपाट पण तासाभरात निफ्टी सेन्सेक्सची उसळी; जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड

Stock Market Closing | सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वधारला, ‘या’ स्टॉक्सची चमकदार कामगिरी

Stock Market Updates | शेअर बाजार सपाट, ‘हे’ शेअर्स आहेत ॲक्शनमध्ये

Back to top button