Stock Market : बाजाराची सुरुवात सपाट पण तासाभरात निफ्टी सेन्सेक्सची उसळी; जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड | पुढारी

Stock Market : बाजाराची सुरुवात सपाट पण तासाभरात निफ्टी सेन्सेक्सची उसळी; जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market : भारतीय शेअर बाजाराची मंगळवारी सुरुवात सपाट झाली. मात्र, जागतिक सकारात्मक संकेतांनंतर अवघ्या तासाभरातच बाजाराने उसळी घेतली. निफ्टीने 50 अंकांची उसळी घेतली तर सेन्सेक्स देखील 100 अंकांनी वधारला. तर बँक निफ्टी 44,400 अंकांच्या जवळ पोहोचला आहे. एकूणच बाजारात आज दिवसभर तेजी दिसण्याची चिन्हे आहेत.

Stock Market : अशी झाली सुरुवात वाचा आकडेवारी

सकारात्मक जागतिक संकेतांमध्‍ये मंगळवारी देशांतर्गत निर्देशांक सपाटपणे उघडले. NSE निफ्टी 50 13.65 अंकांनी किंवा 0.07% घसरून 18,585 वर आला तर BSE सेन्सेक्स 46.96 अंकांनी किंवा 0.07% वाढून 62,893.34 वर पोहोचला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बँक निफ्टी 6.80 अंकांनी किंवा 0.02% ने वाढून 44,318.70 वर, निफ्टी ऑटोने 26.80 अंकांनी किंवा 0.19% ने 14,246.40 वर, निफ्टी IT 122.80 अंकांनी वाढला किंवा 0.4230 अंकांनी वाढला आणि Nifty 0.4230 अंकांनी घसरला.

Stock Market : तासाभरातच निफ्टी सेन्सेक्सची उसळी

सपाट सुरुवातीनंतर काही वेळातच बाजारात हिरवे संकेत मिळण्यास सुरुवात झाली. बाजारात गती जाणवायला लागली. अवघ्या तासाभरातच मार्केटमध्ये निफ्टीने उसळी घेतली आणि निफ्टीने 18600 च्या वर झेप घेतली, सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला; बँक निफ्टी 44400 च्या वर पोहोचला.

Stock Market : हे आहेत टॉप गेनर्स अँड लॉसर्स

सकाळच्या सत्रात निफ्टीने एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, कोटक बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला तर डिव्हिस लॅब, एसबीआय लाइफ, हिंडाल्को, नेस्ले इंडिया आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपन्यांचे नुकसान झाले.

बँक निफ्टीवर ‘या’ बँकांना झाला सर्वाधिक नफा -तोटा

बँक निफ्टी 82.35 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी वाढून 44,394.25 वर पोहोचला. कोटक बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँक हे सर्वाधिक लाभधारक राहिले. तर एयू बँक, एसबीआयएन, बंधन बँक आणि इंडसइंड बँक हे नुकसानीत होते.

IRCTC शेअर्स 2% घसरले

मार्केटमध्ये तेजी नोंदवत असली तरी IRCTC चे शेअर्स घसरले आहेत.

हे ही वाचा :

चीनमध्ये तीन वर्षांनंतर साजरा झाला बन फेस्टिव्हल

सांगली : शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरण; विपूल पाटीलसह चौघे उच्च न्यायालयात शरण

Share Market Closing | शेअर बाजारात खरेदीवर जोर, अदानींच्या शेअर्सनी घेतला यू टर्न, वाचा मार्केटमधील आजच्या घडामोडी

Back to top button