आयकर : दिवाळीतील कोणते गिफ्ट टॅक्स फ्री नाही? | पुढारी

आयकर : दिवाळीतील कोणते गिफ्ट टॅक्स फ्री नाही?

  • विनायक सरदेसाई 

दिवाळी तोंडावर आली आहे. यादरम्यान कंपनीकडून कर्मचार्‍यांना बोनस दिला जातो. तसेच नातेवाईकदेखील एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा प्रकारची भेटवस्तू देवाण-घेवाण करताना आकारण्यात येणार्‍या कराचे स्वरूप ठाऊक आहे का?

लग्न सोहळा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणत्याही सणासुदीला भेटवस्तू देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. अशा निमित्ताने आपणही निकटवर्तीयांना गिफ्ट देत असाल, तर त्यावर कर आकारला जातो. आता दिवाळी तोंडावर आली आहे. यादरम्यान कंपनीकडून कर्मचार्‍यांना बोनस दिला जातो. तसेच नातेवाईकदेखील एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा प्रकारची भेटवस्तू देवाण-घेवाण करताना आकारण्यात येणार्‍या कराचे स्वरूप ठाऊक आहे का? त्याचे नियम माहीत आहेत का? यासंदर्भात जाणून घेऊ.

  •  भेटवस्तू कशाला म्हणतात?

रोख स्वरूपात भेटवस्तू घेणे, अचल मालमत्ता जसे की जमीन किंवा घर, चल संपत्ती जसे की शेअर, दागिने, पेटिंग, मूर्ती.

  •  कोणाकडून मिळालेल्या गिफ्टवर कर नाही?

नवरा-बायको, भाऊ-बहीण, आई-वडील, पती-पत्नीचा भाऊ किंवा बहीण, मुलगा किंवा मुलगी, भाऊ/बहीण किंवा जावई.

  •   कोणते गिफ्ट टॅक्स फ्री नाही?

विवाहात मिळालेली भेटवस्तू, मृत्युपत्र किंवा इच्छापत्राने मिळालेले गिफ्ट, स्थानिक प्रशासनाकडून मिळालेली भेटवस्तू, कलम 10 (23) नुसार शिक्षण संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू, चॅरिटेबल संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू, नातेवाइकांकडून मिळालेली भेटवस्तू.

  •  रोखीत मिळालेले गिफ्ट

नातेवाइकाकडून मिळालेल्या गिफ्टवर कोणताही कर नाही. एका वर्षात 50 हजारांपेक्षा अधिक रोखीवर कर आकारणी. 50 हजारांपेक्षा अधिक रोकडचा करपात्र उत्पन्नात समावेश. 2 लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम घेतल्यास कलम 269 एसटीनुसार दंड.

  •   आई-वडिलांकडून मिळालेली भेट करपात्र?

रक्ताच्या नात्यातून मिळणारे गिफ्ट करमुक्त.  आई-वडील, भाऊ-बहिणींकडून गिफ्ट मिळाल्यास कर नाही. 50 हजार रुपयांपेक्षा अधिक गिफ्ट मिळाले तरी कर नाही.

  •  पती-पत्नीत गिफ्टवर कराचे नियम

पती-पत्नीमध्ये गिफ्ट घेण्या-देण्यावर कर नाही. कलम 64 नुसार गिफ्टपासून मिळणार्‍या उत्पन्नावर काही अटी लागू
पती-पत्नीत गिफ्टची देवाण-घेवाण झाल्यास उत्पन्न क्लबिंग क्षेत्रात येते.

  •  प्रॉपर्टी गिफ्ट करण्यावर नियम

प्रॉपर्टी, शेअर, बाँड, गाडी आदी नातेवाइकांकडून मिळणारे गिफ्ट करमुक्त. प्रॉपर्टी, शेअर देणारा नातेवाईक नसेल तर कर आकारणी. नातेवाइकाकडून गिफ्ट मिळाल्यास गिफ्ट डीड करायला हवे. गिफ्ट डीड केल्याने आयटीआरमध्ये स्रोत दाखवणे सुलभ. गिफ्टमध्ये मिळालेली प्रॉपर्टी विकल्यास कॅपिटल गेन टॅक्स आकारणी.
इच्छापत्रातून मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही कर नाही. इच्छापत्रातून मिळालेली मालमत्ता विकल्यास कर आकारणी.

  • गिफ्ट डीड कशासाठी आवश्यक?

गिफ्ट डीड देण्यापूर्वी डीड तयार करावे. कायदेशीरित्या गिफ्ट डीड नोंदवावा. डीडमधून मिळालेले गिफ्टवर मालकी हक्कावरून वाद नाही. गिफ्ट डीड तयार करण्यासाठी वकील किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी. डीडमध्ये भेट घेणारा किंवा देणारा हे दोघांचे नाव असावे. चल मालमत्तेवर गिफ्ट डीड करणे गरजेचे नाही. अचल मालमत्ता व्यवहारात डीड करणे गरजेचे. इच्छापत्रातील मालमत्ता करपात्र इच्छापत्रातून मिळालेली मालमत्ता गिफ्ट नसते. वारशात मिळालेल्या मालमत्तेवर गिफ्ट टॅक्सचे नियम लागू होत नाहीत. नातेवाइकांकडून मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही कर नाही. ती मालमत्ता विकल्यास कॅपिटल गेन कर भरावा लागेल.

  • लग्नात मिळालेले गिफ्ट करपात्र

विवाहात मिळणारे गिप्ट हे पूर्णपणे करमुक्त असते. कंपनीकडून मिळणारे गिफ्ट हे करश्रेणीत येते. महागडी मोटार किंवा घड्याळ हे गिफ्ट करकक्षेत येत नाही. भेटवस्तूत मिळणारे दागिने करपात्र आहेत.

  •   परकी ट्रस्टकडून मिळणारी भेटवस्तू करपात्र?

परकी ट्रस्टकडून गिफ्ट मिळाल्यास कराचे नियम लागू होतात. विदेशी मित्राला गिफ्ट देणेदेखील करपात्र आहे.
परदेशातील मित्र किंवा ट्रस्टकडून गिफ्ट मिळाल्यास टीडीएस जमा करावा लागेल. परदेशातून 50 हजारांपर्यंतचे गिफ्ट करमुक्त आहे. अशा प्रकारचे गिफ्ट भारतात मिळाल्यास करमुक्त राहील.

  •   रोखीवर कर आकारणी

दोन लाखांपेक्षा अधिक गिफ्ट रोखीने घेतल्यास पेनल्टी. कलम 269-एसटीनुसार पेनल्टीची तरतूद. 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास करआकारणी. एका वर्षात 50 हजारांपेक्षा कमी मूल्याच्या गिफ्टवर कर नाही.

  •   देणगीवर करसवलत

नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टला देणगी देणे करमुक्त. स्वयंसेवी संस्थेला देणगी दिल्यास त्यावर 50 टक्के सवलत.
पीएम केअर फंडच्या देणगीवर शंभर टक्के करसवलत.

Back to top button