निवृत्तीनंतरच्या निर्वाहाचे साधन | पुढारी

निवृत्तीनंतरच्या निर्वाहाचे साधन

आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये कोणती असतात? घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षण आणि आपल्या निवृत्तीपश्चात जीवनात उदरनिर्वाहाचे साधन ही सर्वसामान्य उद्दिष्ट्ये साधारणतः असतात. यापैकी आपल्या निवृत्तीनंतरच्या निर्वाहाचे नियोजन सुरुवातीपासून करणे हे आर्थिक नियोजनाचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे.

सेबीच्या म्युच्युअल फंडाच्या वर्गवारीमध्ये Solutions Oriented हा जो म्युच्युअल फंडांचा प्रकार आहे, त्यामध्ये चिल्ड्रन्स फंड आणि रिटायरमेंट फंडाचा समावेश होतो.

तुम्हालाही तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य तणावरहित व्यतीत करायचे असेल आणि मन:शांती मिळवायची असेल, तर तुमच्या आर्थिक नियोजनात रिटायरमेंट फंडाला मुख्य स्थान असलेच पाहिजे. रिटायरमेंट फंडाचे महत्त्व खालील बाबींमुळे अधोरेखित होते.

1) भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एका सर्वंकष सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या निवृत्तीनंतरच्या मिळकतीची व्यवस्था स्वतःच करणे गरजेचे आहे.

2) विभक्त कुटुंबपद्धतीच्या वाढत्या प्रसारामुळे प्रत्येकाने आर्थिकद़ृष्ट्या स्वतंत्र होणे आवश्यक आहे.

3) वाढती महागाई हा एकूणच जीवनाला ग्रासून टाकणारा भस्मासुर बनला आहे.

4) वृद्धापकाळी इतर खर्च कमी होत असले तरी वैद्यकीय खर्च वाढतात. त्यांची सोय करणे आवश्यक ठरते.

5) अलीकडे सर्वच कुटुंबांना अपुरी मिळकत ही एक समस्या त्रस्त करत असते. त्यामध्ये आपल्यामुळे आणि वाढ होऊ नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

रिटायरमेंट फंडाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या सध्याच्या वयानुसार गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करावा. त्यानंतर आपला आजचा मासिक खर्च आणि त्यानुसार महागाई विचारात घेता भविष्यात होणारा खर्च, आपल्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीच्या साधनांची निवड या गोष्टी विचारात घेऊन लवकरात लवकर SIP द्वारा गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी.

वरीलप्रमाणे रिटायरमेंट फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे निश्चित झाले की, गुंतवणूक साधनांचा शोध घ्यायला तुम्ही सुरुवात केली की, एक नाव तुमच्या नजरेस हरकून पडेल आणि ते म्हणजे HDFC Retirement Savings Fund Equity Plan 25फेब्रुवारी 2016 रोजी तो सुरू झाला. तेव्हापासून 16.91 टक्के असा अत्यंत समाधानकारक सरासरी परतावा या फंडाने दिला आहे. Nifty 500 TRI या फंडाचा Benchmark Index आहे आणि या इंडेक्सपेक्षा अधिक परतावा फंडाने सातत्याने दिला आहे.
खालील कोष्टक पहा.

कालावधी   बेंच मार्क   रिटर्नस फंड रिटर्नस
1 वर्षे          0.66%     3.39%
3 वर्षे         13.14%    16.19%
5 वर्षे         11.48%    12.51%

हा एक Flexi cap प्रकारातील Diversified फंड आहे. फंडाची एकूण गुंतवणूक 68 कंपन्यांच्या शेअर्समध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी 51 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, 25.44 टक्के मिड कॅप, तर 23.64 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आहे. फायनान्शिअल सर्व्हिसेस सेक्टरचे गुंतवणुकीत प्राबल्य असून त्या खालोखाल Capital goods, consumer staples, technology, Energy इ. सेक्टर्सचा अंतर्भाव होतो. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इन्फोसिस आणि एचडीएफसी हे पाच शेअर्स टॉप फाईव्ह आहेत.

श्रीनिवासन राममूर्ती आणि शोभित मेहेरोत्रा हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. या फंडामधील गुंतवणुकीला पाच वर्षांचा Lock In कालावधी आहे. असे असले तरी हा फंड Tax Saving वर्गामध्ये मोडत नाही. शिवाय या फंडाला फक्त Growth option आहे. Dividend Option नाही. सर्वसाधारणपणे Retirement फंडामध्ये दीर्घकालीन कालावधीसाठी लोकांनी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा असते. 500 रु. च्या किमान रकमेने यामध्ये SIP देखील करता येते. एचडीएफसी या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित घराण्याचा हा एक दमदार फंड आहे.

भरत साळोखे 

Back to top button