अभ्यास आणि डोळसपणाने करावी गुंतवणूक | पुढारी

अभ्यास आणि डोळसपणाने करावी गुंतवणूक

-डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. गुजरातमध्ये भाजप किमान 115 व कमाल 150 जागा अपेक्षित होती;  पण तिला 99 जागांवर समाधान मानावे लागलेे. हिमाचल प्रदेशमध्ये तिला 60 टक्के जागा मिळाल्या व तिथे काँग्रेसला मोठी हार घ्यावी लागली. मात्र या दोन्ही ठिकाणी स्थानिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच करिष्माच उपयोगी पडला.

या निकालामुळे शेअर बाजारात स्थैर्यच निर्माण झाले. गेल्या गुरुवारी निफ्टी व निर्देशांक 3940 व 10493 वर बंद झाले. वर्षभरात हे आकडे 37007 व 12500 व्हावेत. 

जागतिक बाजारात क्रूड पेट्रोलचे भाव बॅरलला 65 डॉलरपर्यंत चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलचे उत्पादन करणार्‍या ओएनजीसी व ऑईल इंडिया आणि त्यांची विक्री करणार्‍या व शुद्धीकरण करणार्‍या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, चेन्‍नई पेट्रो, हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमला उज्ज्वल भविष्य आहे. या सर्व कंपन्यांपैकी निदान दोन कंपन्यांत गुंतवणूक हवी. 

ओएनजीसी सध्या 190 रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरात त्यात 35 टक्के वाढ होऊन तो 260 रुपयांवर जावा. गेल्या वर्षभरातील कमाल व किमान भाव 155 रुपये व 211 रुपये होते. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 12.1 पट दिसते. रोज सुमारे 90 लक्ष शेअर्सची उलाढाल होते. एक लार्ज कॅप कंपनी म्हणून अनेक विश्‍लेषक तिचा परामर्श घेऊन आपल्या शिफारसी सतत देत असतात. 

गेल्या आठवड्यात एडेलवाईज फायनान्शिअलने शेलिगेअर कंपनीचा काही व्यवसाय विकत घेतला. त्यामुळे एडेलवाईज आता वाढत राहील. सध्या 290 ते 295 रुपयांच्या पट्ट्यांत तो फिरत आहे. पण तो येत्या बारा महिन्यांत 40 टक्के वाढू शकतो. शेलिगेअर व एडिलवाईजचे आता दहा लक्ष ग्राहक आहेत. नव्या आग्रहामुळे कंपनीचे क्षेत्र विस्तारित होईल. एडिलवाईजने 2011साली कशनील सिक्युरिटीजचे आग्रहण केले होते. तसेच 2010 साली अ‍ॅनाग्रॅम कॅपिटलचे आग्रहण केले होते. 

जिंदाल सॉ  पाईप्स (हिस्सार)चा उल्‍लेख पुढे विस्ताराने ‘चकाकता हिरा’ म्हणून केला आहे तो बघावा. या शेअरमध्ये आवर्जून गुंतवणूक करावी. 

एपी अपोलो ट्यूब्ज आता 2000 रुपयापर्यंत पोचला आहे. वर्षभरात तो 2600 रुपयावर जाईल. 

आपला नेहमीची आवडती दिवाण हौसिंग फायनान्स तर भागभांडारात सदैव हवी. काही दिवसांपूर्वी 570 रुपयापर्यंत हा शेअर खाली आला होता. आता पुन्हा त्याने 605 रुपयांची पातळी  गाठली असली तरी तो रोज बराच खालीवर होतो. 570 रुपयांपर्यंत खरेदी केला तर वर्षभरात तो किमान 35 टक्के तरी नफा देऊन जाईल. गृहवित्तक्षेत्रात इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सचा विचार दिवाण हौसिंग बरोबर होऊ शकतो. 

दुर्बल अशा सात राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेेने सतत देखरेखीखाली ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुंतवणुकीचा विचारही करू नये. किंबहुना स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक एवढ्याचाच विचार करावा. येस बँकेने डिसेंबर 2017 तिमाहीसाठी तिने 25 टक्के आगाऊ कॉर्पोरेट कर भरला आहे. त्यामुळे शेअरचा भाव 310 ते 313 रुपयांवर स्थिरावला आहे. मध्यंतरी रिझर्व्ह बँकेने तिला फटकारले होते म्हणून तो या भावावर आहे. पण दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी येस बँकेचा जरूर विचार करावा. वर्षभरात तो 30 टक्के नफा नक्‍की देऊन जाईल. खासगी बँकांमध्ये डीएसबी बँक व फेडरल बँक, तसेच कर्नाटक बँक घेण्यासारखे आहेत. तरीही आधी उल्‍लेखिलेल्या शेअर्सचा विचार प्राधान्याने करावा. बँक शेअर्समध्ये आवर्जून जाण्यासारखे काहीही नाही.

7 ः 5 लक्ष कोटी रुपयांचे महामार्ग   प्राधिकरण 7.5 लक्ष कोटी रुपयांचे कर्जरोखे विकायला काढणार आहे. दहा वर्षांसाठी त्यावर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळेल व जनतेने त्या विक्रीला हातभार लावावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. आपल्यासाठीच हे महामार्ग महत्त्वाचे आहेत याची जाणीव ठेवून वैयक्‍तिक गुंतवणूकदारांनी त्या आवाहनाला जरूर प्रतिसाद द्यावा. 

बँक ऑफ बरोडाही 4000 कोटी रुपयांचे कर्जरोखे विकायला काढणार आहे. दहा वर्षांसाठी त्यावर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळेल व जनतेने त्या विक्रीला हातभार लावावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. आपल्यासाठीच हे महामार्ग महत्त्वाचे आहेत याची जाणीव ठेवून वैयक्‍तिक गुंतवणूकदारांनी त्या आवाहनाला जरूर प्रतिसाद द्यावा. 

बँक ऑफ बरोडाही 4000 कोटी रुपयांचे कर्जरोखे विकायला काढणार आहे. या सर्व रोख्यांमुळे बाजारातील  द्रवता शोषली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळी शेअरबाजारात उतरायची भीती वाटते. त्याच्यासाठी हे दोन्ही कर्जरोखे  सुरक्षित गुंतवणुकीसाठी उपयोगी ठरतील. 

एकूण भागभांडारात शक्यतो दहा ते पंधरा शेअर्सच असावेत व आत्तापर्यंत ज्या शेअर्सचा परामर्श घेतला आहे त्याच कंपन्यांत विशेषतः गृहवित्त, विविध खनिजे, पोलाद, स्पेशॅलिटी केमिक्स क्षेत्रे इथे गुंतवणूक 2019 साली फलदायी ठरेल. येत्या नव्या वर्षासाठी अनेक ब्रोकरेज कंपन्या विविध शेअर्सची शिफारस करतील. त्यांचा अभ्यास करून डोळसपणे आपली निवड करावी. 

या लेखमालेत ज्याचा परामर्श घेतला जाईल त्याच्याकडेही लक्ष द्यावे. अनेकजण किरकोळ, न ऐकलेल्या शेअर्सची भलावण ते दुप्पट होतील अशी आशा दाखवतील. मोबाईल फोनवरही अशा शिफारसी टाकल्या जातात. त्यावर एकदम विश्‍वास ठेवू नये. A known Devil is better than an unknown angel ही म्हण कायम लक्षात ठेवावी.  पण माहितीचे देवदूत म्हणून फक्‍त निर्देशांकाचे 30 व निफ्टीचे 50 एवढ्यावरच निवड सीमित करू नये. काहीवेळेला अनपेक्षितपणे एखाद्या क्षेत्राला उठाव मिळाला की तिथल्या कंपन्या झळकतात. 

पाँडी ऑक्सि, जिंदाल सॉ  पाईप्स (हिस्सार), एडेलवाईज फायनान्शियल, स्टर्लाइट टेक्नॉलॉजीज, मॉईल, एल अँड टी फायनान्स अशा कंपन्याही जरूर मिळाव्यात. ग्राफाईट इंडियन हेग या कंपन्यांचे शेअर्स आता सध्याच्या  पातळीला स्थिरावले आहेत. त्यात आता फक्‍त दहा टक्के वाढीचीच वर्षभरात शक्यता आहे. त्यामुळे अनुक्रमे 7.40 रुपये व 2190 रुपये या भावाला विक्री करून बाहेर पडावे.

Back to top button