जिंदाल सॉ पाईप्स (हिस्सार) | पुढारी | पुढारी

जिंदाल सॉ पाईप्स (हिस्सार) | पुढारी

यावेळचा ‘चकाकता हिरा’ म्हणून जिंदाल सॉ पाईप्स (हिस्सार) या कंपनीची निवड करता येईल. जिंदाल समूहातील ही कंपनी aset Monetigation Plan मुळे स्वतंत्र करण्यात आली (de-merged) स्टेनलेस स्टीलची ही जगातील क्रमांक एकची कंपनी आहे. या पट्ट्या सिमेंटच्या शेअर्ससाठी वापरल्या जातात. नाण्यासाठी जी इश्ररपज्ञी (कोरी)नाणी लागतात त्याचेदेखील तिथे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. रिझर्व्ह बँकेच्या व जगातील अन्य टांकसाळीसमध्ये या ब्लँक्स वापरल्या जातात. रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्‍चर सुधारण्यासाठी तसेच मेट्रो, हवाई अड्डे, तसेच स्वयंपाकाची भांडी या वस्तूसाठी या स्टेनलेस स्टीलचा उपयोग केला जात आहे. 

हा व्यवसाय दरवर्षी 8 टक्के चक्रवाढ  पद्धतीने वाढणार आहे. चढा वस्तुसेवाकर व चीनमधून येणार्‍या आयातीवर काऊंटरव्हेलिंग ड्युटी लावली जाणार आहे, त्याचाही फायदा जिंदाल सॉ पाईप्स (हिस्सार) या कंपनीला होईल. पुढील पाच वर्षे कंपनीची विक्री 15 टक्क्याने दरसाल वाढणारी आहे. त्यामुळे करोत्तर नफा दरवर्षी 30 टक्क्याने वाढावा. 

सध्या कंपनीचा शेअर 125 रुपयाला मिळत आहे. वर्षभरात त्यात 50 टक्क्यांनी वाढ होऊन तो 188 रुपयांवर जावा. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर हे 39 पट इतके महाग वाटत असले तरी कंपनीचे उज्ज्वल भविष्य व खास तर्‍हेचे उत्पादन यामुळे ते वाजवीच धरले पाहिजे. 

गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव 54 रुपये होता तर कमाल भाव 134 रुपये होता. रोज सुमारे 30 लक्ष शेअर्सचा व्यवहार सध्या होत आहे. 

सध्या 87 वर्षांचे असलेल्या श्री. ओमप्रकाश (ज.झ.) जिंदाल यांनी हरयाणातील हिस्सार गावी ही कंपनी 1970 साली सुरू केली. गेली 47 वर्षे ती उत्तमरितीने चालू आहे व तीन वर्षांनी तिची सुवर्ण जयंती साजरी होईल. सध्या तिची 18 लक्ष मेट्रिक टन इतकी उत्पादन क्षमता आहे. 

जिंदाल समूहाची विक्री वर्षाला 15000 कोटी रुपयांची आहे. रेल्वेचे डबे करण्यात जर स्टेनलेस स्टील वापरले गेले तर अपघात कमी होतील, असे रेल्वेला पटवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचे रंगीत स्टेनलेस स्टील्सचे पत्रे, इमारतीत वापरले जावेत असा काही तिचा प्रयत्न आहे. छप्परे, जमिनी, कॅबिनेटस् या सर्व ठिकाणी स्टेनलेस स्टील वापरले जाऊ शकेल. पाण्याचे दुर्भिक्ष जिथे असेल तिथेही या उत्पादनाच्या टाक्या वापरल्या जाणार आहेत.

प्लंबिंगमध्ये या नळ्या वापरल्या तर दुरुस्ती कधीच करावी लागणार नाही वा नळ बदलावे लागणार नाहीत. दुग्धव्यवसाय व फूड प्रोसेसिंग कंपन्या इथेही स्टेनलेस स्टील मोठ्या प्रमाणात वापरात येऊ शकेल. दिल्‍लीतल्या 2788 बसस्टँडवर स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांचा उपयोग केला गेला आहे. शाळेच्या बसेससाठी दिल्‍लीप्रमाणे अन्य महानगरातही या सुरू व्हायला हरकत नाही. वर्षभरात किमान 35 टक्के नफा देऊ शकणार्‍या या शेअरची जरूर निवड करावी. 

Back to top button