फार्मा आणि हेल्थकेअर फंडस् सध्याच्या काळात लाभदायक | पुढारी

फार्मा आणि हेल्थकेअर फंडस् सध्याच्या काळात लाभदायक

भरत साळोखे

म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण पाहत असताना आपण Thematic किंवा Sectoral फंडाचीही माहिती घेतली होती. त्याचवेळी आपण हेही समजून घेतले होते की, Thematic किंवा Sectoral फंड हे अतिशय जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. कारण या फंडांमधील किमान 80 टक्के गुंतवणूक ही त्या फंडाच्या Theme शी संबंधित कंपन्यांमध्येच होते. Thematic फंडाची सर्वांत मोठी उणीव म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला Diversification चा संपूर्ण अभाव. कारण इथे वेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात नाही. उदा. IT फंड असेल तर IT कंपन्यांमध्येच गुंतवणूक होते किंवा Banking फंड असेल तर बँकांमध्येच गुंतवणूक होते.

Thematic किंवा Sectoral फंडांचा आणखी एक मोठा दोष म्हणजे ते Cyclical असतात. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही कालावधीच्या अंतराने ठराविक क्षेत्रे चांगली कामगिरी करतात. कोणतेही Sector सदासर्वकाळ बहरतच असेल असे नाही. त्यामुळे ज्या काळामध्ये आपण निवडलेल्या फंडाचे क्षेत्र पिछाडीवर असेल तर त्या काळात त्यांची कामगिरी सुमारच होणार. 

अशा Thematic किंवा Sectoral फंडामध्ये एक वर्ग आहे. Pharma किंवा Healthcare फंडांचा!  2016 ते 2019 हा काळ या फंडांच्या द़ृष्टीने अतिशय निराशाजनक होता. परंतु 2019 च्या कोव्हिड-19 च्या महामारीने या सेक्टरला जणू नवसंजीवनी प्राप्त करून दिली. सन 2020 या एका आर्थिक वर्षात  S&P, BSE, Healthcare Index  61 टक्क्यांनी वाढला. याच एका वर्षात सेन्सेक्स 15 टक्क्यांनी वाढला म्हणजे सेन्सेक्सच्या चौपट वाढ Healthcare Index  ने नोंदवली. या इंडेक्समधील जवळजवळ सर्व कंपन्यांच्या स्टॉक्स्मध्ये दमदार वाढ झाली असली तरी खालील पाच कंपन्यांनी त्यांच्या शेअर होल्डर्सचे पैसे 2020 च्या एका वर्षात दुप्पटीहून अधिक केले आहेत.

फार्मा किंवा हेल्थकेअर फंडांनी गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे, ते याचमुळे! कारण हे फंड याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे पर्यायाने त्यांची कामगिरी 2019 पासून बहारदार झालेली आहे. फार्मा आणि हेल्थकेअर फंडांनी गेल्या एक वर्षामध्ये सरासरी 70 टक्के रिटर्नस् दिले आहे. फार्मा सेक्टरमधील सर्वोत्कृष्ट 5 फंडांची गेल्या वर्षातील कामगिरी खालील टेबलमध्ये पहा.

सध्याची कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेतली तर आज सर्व जगभर दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे आणि भारतातील परिस्थिती तर खूपच विदारक आहे. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने तिसर्‍या लाटेचाही इशारा दिलेला आहे. त्यामुळे सर्व लोक आपल्या आरोग्याविषयी खूपच सचित झाले आहेत. कोरोनावरील विविध कंपन्यांनी तयार केलेली Vaccines, Supportive medicines यांचा प्रचंड खप होतो आहे. हे सर्व पाहता पुढील किमान दोन वर्षे तरी Pharma Sector असेच Out Perform करीत राहील. यात शंका नाही. गुंतवणूकदारांनी 1 ते 3 वर्षांचा मध्यम अवधी डोळ्यांसमोर ठेवून फार्मा फंडांमध्ये अवश्य गुंतवणूक करावी. पण ती करण्यापूर्वी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार, जोखमीनुसार आपल्या गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. कारण सर्वसाधारणपणे Thematic किंवा Sectoral फंडामध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करू नये, असे जाणकार सांगतात. 

या फंडामधील गुंतवणूक कोणत्या कंपन्यांमध्ये होते, हे लक्षात येण्साठी DSP Healthcare फंडामधील टॉप टेन होल्डिंग खाली दिले आहे.

Back to top button