पुणे शहरात वर्षभरात 42 बालकांचा जन्मतः मृत्यू

File photo
File photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे शहरात कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरात 42 मुलांचा जन्मत:च तसेच काहींचा गर्भात असतानाच (स्टीलबर्थ) मृत्यू झाला. गुदमरणे, कमी वजन, दिवस भरण्याआधी झालेली प्रसूती आदी कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत.

कोरोनाच्या काळात अनेक रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात आली. तसेच जी केवळ प्रसूतीसाठी होती ती देखील कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरण्यात आली. त्यामुळे प्रसूतीचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच अनेक गर्भवतींना कोरोनाची बाधा झाली आणि त्यामध्ये त्यांनी बालकांना जन्म दिला. मात्र, कोरोनामुळे मुलांमध्ये फारशी कोणतीही गुंतागुंत दिसून आली नाही. मात्र, प्रसूतीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.

कोरोना काळात एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान 46 बालकांचा पोटातच तसेच जन्म झाल्यावर मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली. तर त्याआधीच्या वर्षी ही संख्या 110 इतकी होती. गेल्यावर्षीही इतकीच संख्या असण्याची शक्यता असून कोरोनामुळे अनेक महिलांना बेड मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यातच मुलांचे मृत्यू झाले असले तरी त्यांची शासकीय किंवा खासगी रुग्णालयांत नोंद झाली नाही किंवा ती शासनाकडे पाठवली गेली नाही, असे आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

मुलांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. यामध्ये दिवस भरण्याआधीच झालेला जन्म (प्रीटर्म बर्थ), वजन कमी असणे, ह्दयविकार असणे, जन्मताना गुदमरणे तसेच जन्मतः व्यंग असणे या कारणांचा समावेश आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news