रोजच्या जेवणात दहीभात खाण्याचे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक | पुढारी

रोजच्या जेवणात दहीभात खाण्याचे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक

पुढारी ऑनलाईन : भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक चविष्ट पदार्थ पहायला मिळतात. यातील रोजच्या जेवणातील अनेक पदार्थ साधे वाटत असले तरी आरोग्याच्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यापैकीच एक पदार्थ आहे दही भात. आरोग्यदायी आणि सहज पचणाऱ्या पदार्थांमध्ये तांदळाच्या खिचडीनंतर दही भाताचा समावेश होतो. तुम्हाला माहिती आहे का? दही भाताचा रोजच्या जेवणात समावेश करणं अतिशय फायदेशीर आहे.

जाणून घेऊया दहिभाताचे रोजच्या जेवणातील फायदे :

हाडे आणि दातांसाठी फायदेशीर : दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे हाडे आणि दातांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे या दोहोंला मजबूती मिळण्यास मदत होते.

पचन सुधारण्यास मदत : अनेकांना जेवणानंतर पोट जड होण्याची समस्या असते. किंवा पचनासंबंधीही अनेक समस्या भेडसावत असतात. दह्यामधील प्रो बायोटिक अन्न पचनास मदत करतात. याशिवाय आतडीमधील बॅक्टीरियाचे काम सुधारण्यास मदत करतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ति वाढते.

पोषणमूल्ये भरपूर : दहीभात हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा आहार आहे. दह्यात असलेलं प्रोटीन मांसपेशी मजबूत करण्यास मदत करते. तसेच त्यातील प्रोबायोटीक पचनासाठी फायदेशीर आहे. दही भात खाल्ल्याने बराच काळ पोट भरलेलं राहत. यामुळे डाएटसाठी किंवा फिटनेसबाबत दक्ष असणाऱ्या लोकांनी जरूर दहीभात खावा.

आजारी पाडणाऱ्या बॅक्टीरियाशी लढा : दही भाताने पचन सुधारते. परिणामी चयापचय क्रिया उत्तमप्रकारे काम करते. यामुळे एकंदरीत शारीरिक स्वास्थ उत्तम राहण्याच मदत होते. तसेच यामुळे बराचकाळ वजन मेंटेन ठेवण्यास मदत होते.

Back to top button