पोटावरील वाढत्‍या चरबीमुळे केस गळतात? जाणून घ्‍या तज्ज्ञ काय सांगतात… | पुढारी

पोटावरील वाढत्‍या चरबीमुळे केस गळतात? जाणून घ्‍या तज्ज्ञ काय सांगतात...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधुनिक जीवनशैलीत वाढते वजन ही एक मोठी समस्‍या भेडसावत आहे. ( Belly fat and hair loss ) विशेषत: पोटावरील वाढती चरबी हे भारतात मोठ्या प्रमाणावर दिसते; पोटाची चरबी आणि केस गळणे यात अप्रत्यक्ष संबंध आहे का? यावर कॅलिफोर्निया येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पलानिअप्पन मणिकम यांनी इंस्टाग्रामवर माहिती शेअर केली आहे. जाणून घेवूया ते काय म्‍हणतात…

Belly fat and hair loss : पोटावरील चरबी ठरु शकते केस गळतीस कारणीभूत

पोटावरील वाढती चरबी आणि केस गळती यांच्‍या संबंधांबाबत डॉ. मणिकम आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हणतात की, पोटावरीलचरबी हे केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. इन्सुलिन-सदृश ग्रोथ फॅक्टर (IGF-1) हे केसांच्या बल्बच्या मुळापर्यंत रक्त प्रवाह वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे संप्रेरक आहे. या संप्रेरकामुळे केस गळती रोखते. या हार्मोनचे कार्य इन्सुलिनसारखेच असे. जेव्हा इन्सुलिन काम करण्‍याचे थांबवते तेव्‍हा IGF देखील आपले कार्य बंद करते. त्यामुळे केसांची वाढ कमी होते आणि केस गळतीही सुरु होते”.

इन्सुलिन हा स्वादुपिंडातून स्रावित होणारा शरीरातील एक महत्त्वाचा संप्रेरक आहे. इन्सुलिन रक्तप्रवाहातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते. हे यकृत, चरबी आणि स्नायूंमध्ये ग्लुकोज संचयित करण्यास देखील मदत करते. तसेच शरीरातील कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि प्रथिने चयापचय नियंत्रित करते. IGF हे रक्तामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे हार्मोन आहे, ज्याचे मुख्य कार्य ग्रोथ हार्मोन (GH) चे परिणाम व्यवस्थापित करणे आहे. त्यात ऊती आणि हाडांची वाढ समाविष्ट आहे. त्‍याचबराेबर केसांच्या मुळवरही परिणाम करते. पुरुषांमध्ये कंबरेचा घेर ९० सेमी आणि महिलांमध्ये ८० सेमीपेक्षा जास्त असेल तर ते पोटावरील चरबीतील वाढ समजली जाते. पोटावरील चरबी वाढत असेल तर संबंधित व्यक्तीला केस गळण्याची ९० टक्‍के शक्‍यता असते, असे  डॉ. मणिकम  यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

नियमित व्‍यायाम ठरताे फायदेशीर

पोटावरील चरबी कमी करण्‍यासाठी. आहाराबरोबर दर आठवड्याला १५० मिनिटे व्‍यायाय करणे आवश्‍यक आहे.
व्‍यायामामुळे इन्सुलिन कार्यक्षमतेने कार्य करते. त्‍यामुळे आहाराबरोबर व्‍यायामाची जोड दिली पोटावरील चरबी कमी होण्‍यास मदत होते, असा सल्‍लाही डॉ. मणिकम देतात.

Back to top button