प्रोस्टेट ग्रंथीचे (BPH) वाढणे | पुढारी | पुढारी

प्रोस्टेट ग्रंथीचे (BPH) वाढणे | पुढारी

डॉ. सौ. सपना गांधी

प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुषांमध्ये आक्रोडच्या आकाराची असते. प्रोस्टेट ग्रंथीचे मुख्य कार्य एक, असे स्राव स्रावण्याचे की जे शुक्राणूंचे पोषण करते व त्यांना Carry करणे की जे मूत्रनलिकेतून योग्य वेळी बाहेर सोडले जाते. प्रोस्टेट ग्रंथी ही लघुशंखेची पिशवी व मोठ्या आंत्राचा जेथे शेवट होतो, त्यांच्या बरोबर मध्ये असते, तसेच मूत्रनलिका ही प्रोस्टेट ग्रंथीबरोबर सेंटरपासून पुढे जाते. पुरुषांमध्ये आपण नेहमी बघतो, की जसजसे वय वाढत जाते तसतसे प्रोस्टेट ग्रंथी वाढत जाते व बर्‍याच रुग्णांना त्याची लक्षणे दिसतात, तसेच बर्‍याच रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत, तर बर्‍याच रुग्णांना भयंकर त्रास होतो, की ते त्यांना रूटीन जीवन जगणे अस्वस्थ होते.

प्रोस्टेट ग्रंथी जसजशी मोठी होत जाते, तसतसे मूत्रनलिकेवर त्यांचा दाब पडून रुग्णांना लघवीचे प्रॉब्लेम्स चालू होतात.

लक्षणे : 1. लघवीची धार बारीक होते. 2. लघुशंखेनंतर ही काळी लघवी बाकी आहे, असे वाटणे. 3. लघुशंकेनंतरही थेंब थेंब लघवी होत राहणे.  4. लघवीच्या सुरुवातीला त्रास होऊ लागतो.  5. सारखे सारखे लघवीला जावे लागते. 6. शिवाय एकदम घाईघाईने लघवीला येणे, की वॉशरूमपर्यंत जाईपर्यंतही दम धरत नाही, Leak होते.

* प्रोस्टेट वाढण्याची कारणे – तशी काही ठोस कारण नाही; पण जसजसे वय वाढत जाते, तसतसे Prostate Gland वाढत जाते. वय 50 आणि पुढचे, हार्मोनल लेेव्हल Change झाली तर (Ostrogen & Testostron), ओबेसीटी डायबेटीस, अनुवंशिकता

ट्रिटमेंट : 1. काही पेशंटला विशेष त्रास नसतो व ट्रिटमेंट घेताच आराम पडतो. 2. काहीजणांना गोळ्या-औषधांनी फरक पडतो. 3. ऑपरेशन ही काही वेळा गरज लागते; पण जर होमिओपॅथीची ट्रीटमेंट रुग्णांनी व्यवस्थित घेतली, तर रुग्णांना होणारा त्रास हा ऑपरेशन न करताच बरा होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये रुग्णांचे पूर्व परीक्षण शरीर व मानसिकतेचे, अनुवंशिकतेचे, आहार इ. सर्व बारकावे सूक्ष्म पद्धतीने अभ्यासले जातात व रुग्णाला लागू पडणारे औषध योग्य मात्रेत योग्य पद्धतीने दिले जाते, जेणेकरून काही कालावधीतच रुग्णाला लक्षणे कमी झाल्याचे लक्षात येते आणि शिवाय सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट ग्रंथी नॉर्मल असल्याचे समजते. प्रत्येक रुग्ण हा दुसर्‍या रुग्णापेक्षा वेगळा असतो. होमिओपॅथिक औषधे खाली दिले आहे, तरी तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच ती घ्यावीत.

1. Thuja – हे औषध प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यावर आणि रुग्णाला लघवीला जळजळ, वारंवार जावे लागणे, युरीन इन्फे क्शन वरचेवर राहते. मेडिसीन घेऊनही परत परत तक्रारी राहतात. हे रुग्ण स्थुल व थंड प्रकृतीचे असतात. अनुवंशिकताही असते.

2. Lycopalium वरचेवर लघवी लागणे, लघवी करतेसमयी व झाल्यानंतर जागेवर जळजळ होणे, लघवी थांबून, अडून होणे, बारीक धार लागणे, कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीबरोबर किडनी स्टोनचाही त्रास असू शकतो.

3. Conium – हे औषध वय जसजसे वाढत जाते, तसतसे प्रोस्टेट ग्रंथी वाढते. वयोमानानुसार होणारा त्रासावर हे औषध चालते.

4. Causticum – हे औषध ज्या रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथीच्या त्रासामुळे लघवी थेंब थेंब होणे व लघवीला कंट्रोलच राहत नाही. खूप शर्मिंदा व्हायला होते. हे रुग्ण खूप भावनाशील असतात. परोपकारीही असतात. दुसर्‍यांसाठी काम करण्यास त्यांना आवडते. कोणावर अन्याय होत असेल, तर ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतात. असे अनेक औषधे प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर उपयोगी पडतात; परंतु ते नेहमी योग्य होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच घ्यावीत.

Back to top button