Menstrual Hygiene Day | २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन का साजरा केला जातो?

28 मे रोजीच मासिक पाळी स्वच्छता दिन का साजरा केला जातो?
28 मे रोजीच मासिक पाळी स्वच्छता दिन का साजरा केला जातो?
Published on
Updated on

[author title="सोनाली जाधव" image="http://"][/author]

मासिक पाळी म्हटलं की आजही लोकांच्या भूवया उंचवताना दिसतात. कुजबूज केली जाते. आजही स्त्रीच्या मासिक पाळीचे महिन्यातील 'चार-पाच' दिवस तिच्यापुरते मर्यादित राहिलेले आपण पाहतो. आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. २८ मे रोजीच मासिक पाळी स्वच्छता दिन (Menstrual Hygiene Day) का साजरा केला जातो? हे आपण समजून घेवूया.

मासिक पाळी स्वच्छता दिन

  • मे महिन्याच्या २८ तारखेला मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो
  • मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया
  • आजही मासिक पाळी संदर्भात गैरसमज पाहायला मिळतात

मासिक पाळी

आज २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. आपण आपल्या आजुबाजूला पाहिलं की लक्षात येईल मासिक पाळी म्हटलं की, "तेरी भी चूप और मेरी भी चूप" असंच काहीस वातावरण पाहायला मिळतं. आजही आपल्याकडची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर जाहीरपणे  बोलणं टाळलं जातं. परिस्थिती बदलतेय मासिक पाळीच्या संदर्भात काहीजण उघडपण बोलायला लागले आहेत; पण ही परिस्थिती खूप ठिकाणी पाहायला मिळते. बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात महिन्यातील मासिक पाळीचे दिवस तिच्यापुरते मर्यादित राहून जातात.

बहुतांश महिला आणि पुरुष आजही मासिक पाळीच्या संबधित माहितीबद्दल अनभिज्ञ आहेत. मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळी येण्याअगोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, आजार याबद्दल माहिती नाही किंवा अपुरी आहे. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे का?  तर अजिबात नाही. शहरातही फारशी वेगळी परिस्‍थिती नाही. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता घ्यायची याबद्दल माहिती मिळावी, त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी हा दिन मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा केला जातो. हा मे महिन्याच्या २८ मे राेजीच (Menstrual Hygiene Day) का साजरा करतात हे जाणून घेण तितकचं गरजेच आहे.

मे महिन्याची २८ तारीखच का?

दरवर्षी मे महिन्याच्या २८ तारखेला 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day) साजरा करतात. पहिल्यांदा २०१४ मध्ये मध्ये एका एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणत:, महिलांच्या मासिक पाळीचे चक्र हे  २८ दिवसांचे असते. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव हा साधारणपणे ४ ते ५ दिवस होत असतो. म्हणूनच हा दिवस इंग्रजी वर्षातील पाचव्या महिन्याची म्हणजे मे महिन्याच्‍या २८ तारखेलाच  साजरा करतात.

Menstrual Hygiene Day
Menstrual Hygiene Day

आजही मासिक पाळीच्यादरम्यान स्वच्छता कशी घेतली पाहिजे, याबद्दल महिलांना म्हणावी तशी माहिती नाही. कधी-कधी महिला लाजून पाळीदरम्यान वापरलेले कापड कोण पाहणार नाही अशा ठिकाणी सुकत घालतात, जर पॅड वापरत असतील तर कोण पाहणार नाही याची काळजी घेत ते पॅड घाईगडबडीत टाकताना दिसतात. पण मासिक पाळीच्या दरम्यान जी काही साधने वापरतात ती त्याबद्दल माहिती असणं आणि त्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे याबद्दल माहिती असणं गरजेच असते.

Menstrual Hygiene Day
Menstrual Hygiene Day

मासिक पाळीदरम्यान अशी घ्या काळजी

  • मासिक पाळी दरम्यान तुम्ही जर सुती कापड वापरात असाल तर ते कापड स्वच्छ असू द्या. ते कापड स्वच्छ धूवा. वाळवत                 असताना प्रकाशात वाळू द्या.
  • सॅनिटरी पॅड वापरत असाल तर, साधारणपणे दर चार ते सहा तासांनी बदला. कारण एकच पॅड बराच वेळ वापरणे आरोग्यासाठी हानिकारक बनू शकते. यामुळे संसर्गही होऊ शकतो.
  • पॅड वापरत असताना हात स्वच्छ करुनच पॅड हातात घेवून वापरा.
  • टॅम्पॉनचा वापर करत असाल तर तीन ते चार तासांनी बदला, स्वच्छ धुवून वापरा.
  •  मासिक पाळी दरम्यान असो वा इतरवेळी तुम्ही अंतर्वस्त्रे स्वच्छ घाला. त्याचबरोबर कोणी वापरलेली तुम्ही वापरु नका.
  • मासिक पाळी दरम्यान तज्ज्ञांच्या सल्ल्याने सकस आहार घ्या आणि व्यायाम करा.

आहार, स्वच्छता, व्यायाम याची माहिती मिळणे गरजेचे

मासिक पाळी संबंधित मुलींशी आरोग्यसंवाद करणारे योगेश सुवर्णा आनंदा म्हणतात, "मासिक पाळी या विषयावर शाळेमध्ये मुलींशी जेव्हा बोलणं होतं, तेव्हा लक्षात येते की, पाळी येण्यापूर्वी त्यांना कुणीही माहिती दिलेली नसते. तर पाळी आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना माहिती दिली जाते, बऱ्यापैकी ती अवैज्ञानिक, चुकीची आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी असते. त्या पाठीमागचे विज्ञान समजावून देण्याऐवजी, 'आता तू मोठी झालीस' आता हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशी बंधनेच जास्त लादली जातात. पाळी विषयीच्या अंधश्रद्धा न पाळता त्या काळात घ्यावा लागणारा आहार, स्वच्छता, व्यायाम इत्यादी सर्व गोष्टींची माहिती त्यांना त्यांच्या घरातून किंवा शाळेतून मिळणं खूप गरजेचे आहे".

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news