नैसर्गिक गर्भधारणा कशी होते? | पुढारी | पुढारी

नैसर्गिक गर्भधारणा कशी होते? | पुढारी

डॉ. प्रवीण हेंद्रे

‘पाच वर्षे झाली आमच्या लग्‍नाला, पहिले वर्ष सोडले तर गेली चार वर्षे आम्ही एकत्र राहतो व गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहोत, पण अजूनही गर्भधारणा झालेली नाही.’ ‘डॉक्टर लग्‍नाच्या आधी माझ्या मित्रांनी पार्टी केली होती व त्या सर्वांनी मला सांगितले होते, बाळ हवे असेल तर मासिक पाळीच्या सुरुवातीला समागम करावा. आम्ही अगदी त्यांच्या सूचना तंतोतंत पाळूनही अजूनही पत्नीस दिवस गेले नाहीत, तर काय करायचे.’ अशा अपत्यप्राप्‍तीसाठी इच्छुक जोडप्यांना स्त्री बीज निर्मितीची माहिती नसणे हे एक यश न येण्यामागे मुख्य कारण आढळते.

आपल्या शालेय शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचा पूर्वी अभाव होता त्यामुळे शरीराबद्दल नैसर्गिक माहितीव्यतिरिक्‍त वैज्ञानिक माहितीच्या अभावामुळे काही जोडप्यांना समागमावेळी वीर्यस्खलन शरीराबाहेर होते, हे वैद्यकीय सल्ला मिळेपर्यंत माहिती नसते. तेव्हा स्त्रीची मासिक पाळी, स्त्री-पुरुष संबंध, स्त्री बीज निर्मितीचा कालावधी व योग्यप्रकारे करावयाच्या क्रिया यांचे समुपदेश करावे लागते.

संबंधित बातम्या

काही जोडप्यांमध्ये माहितीच्या अभावामुळे त्यांनी Consumation of marraige म्हणजे लग्‍न होऊनही चार-पाच वर्षे झाल्यानंतरही योग्य प्रकारे समागम झालेला नसतो. अशा जोडप्यांना योग्य मार्गदर्शनानंतर लवकरच अपत्यप्राप्ती होते.

वंध्यत्वामध्ये अगदी साध्यासाध्या कारणापासून ते स्त्री बीज निर्मितीमधील कठीण असे अडथळ्यांचे विकार असू शकतात. म्हणून सुरुवातीला नैसर्गिक गर्भधारणा कशी होते, हे आपण पाहू या.

जर या नैसर्गिक गर्भधारणेच्या उपचारानंतर जर यश प्राप्‍त झाले नाही, तर IUI, Super IUI, IVF करावे लागते. आज थोडे उपचार केले की, लगेच IVF करावा असा विचार या जोडप्यांच्या मनात घोळत असतो. परंतु, IVF सुद्धा 100 टक्के यशस्विता देत नाही व IVF म्हणजे सर्व विकारांचे उत्तर असू शकत नाही.

त्याकरिता आपण नैसर्गिक गर्भधारणेचा घटनाक्रम पाहू या.

प्रथम आपण गर्भ कसा होतो हे पाहू. स्त्री जननेंद्रियाचे दोन भाग असतात, एक बाह्य जननेंद्रिय व आंत्र जननेंद्रिय. बाह्य जननेंद्रिय याचे मुख बाहेरून उघडे असते, ज्याद्वारे समागम होतो. ही जनन मार्ग नलिका आंत्र जननेंद्रियापर्यंत पोहोचते. आंत्र जननेंद्रियांचे दोन भाग असतात. एक गर्भाशय, दुसरे दोन्ही बाजूस असलेल्या गर्भनलिका व त्याच्या जवळच असणारे डावे व उजवे स्त्री बीजांड (ओव्हरी) हे होय. (पुरुष बाह्य जननेंद्रिय म्हणजे शिस्न. शिस्न समागमाचा अवयव आहे. या शिस्नाद्वारे समागमावेळी वीर्य स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचविले जाते. एक मिली वीर्यामध्ये दोन कोटी शुक्राणू असतात.) व या शुक्राणूंना स्वत:ची हालचाल करण्यासाठी शेपूट असते. केवळ चपळ शुक्राणूच आपल्या शेपटाच्या सहाय्याने जननमार्गातील गर्भाशयाच्या मुखामधून गर्भाशयापर्यंत पोहोचतात. गर्भाशयाला एक उजवी व डावी अशा दोन गर्भनलिका असतात. त्या गर्भनलिकेचे कार्य म्हणजे शुक्राणूंना स्त्री बीजापर्यंत पोहोचवणे तसेच तयार झालेला गर्भ गर्भनलिकेच्या एका टोकापासून गर्भाशयाच्या बाजूच्या टोकापर्यंत पोहोचवणे आहे. गर्भाशयात पोहोचलेले शुक्राणू आता गर्भनलिकेमध्ये प्रवेश करतात व अशाप्रकारे ते गर्भ दर महिन्याला एका बीजांडातून सरासरी एक स्त्री बीज (अंडे) तयार करते व गर्भनलिकेच्या टोकांना असलेल्या बोटासारख्या (Fimbria)च्या सहाय्याने ते गर्भनलिकेमध्ये ओढून घेतले जाते. स्त्री बीजाचे शुक्राणूद्वारे फलन या गर्भनलिकेच्या टोकाला होते. शुक्राणूला स्वयंभूपणे हालचाल करण्यासाठी शेपटी असते; परंतु स्त्री बीज व स्त्री बीजामध्ये शुक्राणूचा शिरकाव झाला की, त्याचे भ्रुणामध्ये रूपांतर होते ते संपूर्ण गोलाकार असते. मुळात कठीण असलेले कवच (Zonapellicida) एका शुक्राणूचा शिरकाव झाला की दुसर्‍या शुक्राणूला शिरण्यास मज्जाव करते. कवच (Zonapellicida) हे आणखीनच कठीण व अभेद्य झालेले असते तर अशा गोलाकार भ्रुणास गर्भनलिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत नेण्यासाठी गर्भनलिकेमधील (Cilia) च्या लयबद्ध हालचालीचा उपयोग होतो व त्यासाठी गर्भनलिका निरोगी असणे अत्यंत गरजेचे असते. जर गर्भ गर्भाशयात पोहोचू शकला नाही व गर्भनलिकेमध्ये रुजला तर अशी प्रेग्‍नंसी एक्टोपिक होऊन ती पोटातच फुटू शकते व स्त्रीच्या जीवास धोका होण्याचा संभव असतो. अशाप्रकारे तयार झालेला तयार झालेला गर्भ गर्भनलिकद्वारे गर्भाशयात पोहोचतो व तेथील (Endometrium) मध्य रुजतो. तो रुजल्यानंतर साधारण आठ ते साडेआठ महिने त्याचे संगोपन तिथेच होते व नंतर बाळंतपणाच्या कळा सुरू होऊन बाळ जन्मास येते, तर ही थोडक्यात अपत्यप्राप्तीची प्रक्रिया आहे. थोडक्यात स्त्री बीज (अंडे) व शुक्राणूंचे मीलन हे गर्भनलिकेमध्ये होते व हा गर्भ गर्भाशयामध्ये रुजतो व जननमार्गाद्वारे मूल जन्माला येते.

नैसर्गिक गर्भधारणेसाठी उपचाराचे Principle एकच असते की प्रथम जननमार्ग हा नॉर्मल आहे का, पहावे लागते. तसेच शुक्राणूची संख्या व चपळता योग्य लागते व स्त्रियांना दिली जाणारी औषधे ही जास्तीची स्त्री बीजे निर्माण करण्यासाठी असतात. त्यामध्ये Clomifen च्या गोळ्यापासून ‘r’ FSH (recombinant) पर्यंतची औषधे वापरली जातात.

स्त्री बीज निर्मितीच्या वेळेस समागम करण्यास सांगणे हा उपचाराचा एक भाग आहे. स्त्री बीजाभोवतीचे Follicle आठ मिमीपासून 18 ते 20 मिमी मोठे होते व त्यानंतर बीजांडातून स्त्री बीज मुक्‍त होते व गर्भनलिकेत येते. तेव्हा तिथे पोहोचलेले शुक्राणूंनी स्त्री बीजाचे फलन करणे हे केवळ त्या शुक्राणूच्या क्षमतेवरच अवलंबून असते.

IUI मध्येसुद्धा जेव्हा शुक्राणू गर्भनलिकेमध्ये पोहोचतात तेव्हासुद्धा स्त्री बीजामध्ये शुक्राणूंनी प्रवेश स्वत:च करावा लागतो. यावर मात करण्यासाठी शेवटी ICSI ची मदत घ्यावी लागते. IUI व IVF बद्दल पुढील लेखात पाहू.

Back to top button