मुलांचे आरोग्य आणि  होमिओपॅथी  | पुढारी | पुढारी

मुलांचे आरोग्य आणि  होमिओपॅथी  | पुढारी

डॉ. अश्फाक उल्‍ला मुजावर

आपण सर्वजण 21 व्या शतकात पदार्पण करणार आहोत. नवीन शतक नवीन उत्साह, नवीन संकल्पना, नवी वाटचाल, नवी स्वप्ने असं संगळ काही नवं नवं असेल तसेच मानव जातीची जीवन काही जगण्याची आव्हाने पण नव्यानेच असतील. किंबहुना एका नवीन रूपात एका नव्या स्तरावरची आव्हाने पेलण्यासाठी आपण तयार व्हायलाच पाहिजे.

जीवनातील सर्वच क्षेत्रात नवनवीन बदल, आव्हाने येऊ घातली आहेत. तसेच आपल्या कौटुंबिक जीवनात आणि पर्यायाने आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या क्षेत्रातसुद्धा बर्‍याच बदलांना सामोरे जावे लागणार आहे.

असं म्हटलं जातं की 21 वे शतक हे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे शतक असणार आहे. जिथे माणसाचे जीवन सुकर बनवण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाक्षणाला टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे आणि या वापरामुळे आपले जीवन जेवढे सुकर बनणार आहे. तेवढेच त्याचे दूरदर्शी परिणाम आपल्या आरोग्यावर नक्‍कीच होणार आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये जन्माला येणारे बाळ पण पार स्पेशल असणार आहे. याची झलक आपणाला या शतकाच्या सरतेशेवटी दिसत आहे.

आज जर मुलांमध्ये आढळणार्‍या आजारांचा आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की पूर्वी मुलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारे आजार हे संसर्गजन्य होते. जसे टॉन्सीलायटीस ट्युबरक्यूलॉसीस (TB) न्यूमोनिया टायफाईड पण या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले अणि त्याची जागा अजंतू संसर्गजन्य आजारांनी घेतली ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये सर्वतोपरी बदल होणे (Behavioural Disorder) आणि वेगवेगळ्या वस्तूंची अ‍ॅलर्जी ऑटीझम (Autism)ADHD अशा अती गंभीर स्तरावरील आजारांनी घेतली.

आज घडीला मुलांची पिढी ही जास्त हायपर अ‍ॅक्टिव्ह (Hyperactive ) स्मार्ट, हुशार अशा पद्धतीची आहे. हे अ‍ॅक्टिव्ह असणं स्वतःमध्ये रममान असणे हे नॉर्मल स्तराच्या बाहेरचेच असत आणि आपल्या कुटुंबाला प्रश्‍न पडतो, की याला आवरायचे ते कसं ?

हे असे का घडले किंवा येऊ घातलेल्या शतकामध्ये अशा आजारांच्या बालकाचे प्रमाण हे नक्‍कीच वाढलेलं असणार आहे, यात काहीही शंका नाही. जर खरंच असे झालं तर ते एक सुद‍ृढ कुटुंब पर्यायाने सुद‍ृढ समाज आणि पर्यायाने सुद‍ृढ देश बनवण्याच्या मागील मोठे अडथळे ठरणार आहेत. यामागील कारणांचा शोध घेणे आणि त्यावर योग्यवेळी उपचार घेणे हे क्रमप्राप्त आहे.

नवीन शतकामध्ये सर्वसाधारणपणे आई, वडील हे दोघेही नोकरी, व्यवसायात मग्‍न असणार आहेत. कारण 21वे शतक हे स्पर्धेचे, चढाओढीचे असणार आहे. त्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जोडप्याला ही धडपड करावी लागणार आहे. ही धावपळ, धडपड चालू असताना जर स्त्रीला समजले की आपण आई होणार आहोत तर त्या आईची मानसिकता काय असेल याचा विचार करणे गरजेचे आहे. जर हे मूल नियोजित असेल तर थोडे ठीक आहे, पण जर हे मूल नियोजित नसेल, त्यांच्या प्लानिंगनुसार नसेल तर तो त्यांना मानसिक धक्‍का असेल. जिथं आनंदाचे वातावरण व्हायला पाहिजे तिथे कुटुंबात चिंतेचे वातावरण बनते.

खरंच आता आपण मुलाला जन्म द्यायला तयार आहोत का? माझे प्रमोशन, माझी नोकरी यावर काय ‘परिणाम होईल की?’ अशा अनेक प्रश्‍नांनी ती आई ग्रासली जाते. साहजिक या सर्वांचा परिणाम गर्भाशयातील गर्भावर होणारच. गर्भ ठेवावा की नको ही द्विधा मनस्थिती आणि त्यामुळे गर्भावर होणारे परिणाम घेऊनच जन्माला येणारे बाळ हे काहीतरी आजारपण घेऊन येते. 

पूर्वी गर्भधारणेची बातमी ऐकून सगळं घर आनंदीत होऊन गर्भसंस्काराची तयारी करायचे. तिथे ही आजची जोडपी वेगवेगळ्या प्रश्‍नांनी, काळजीने ग्रासली गेलेली दिसतात. मग आपण अंदाज बांधू शकतो की येणार्‍या मुलांचे आरोग्य कसे असेल.  

पूर्वीच्या काळी गरोदर मातेला गर्भधारणा झाल्यापासून ती एक विशेष स्त्री बनली आहे, ती नेहमी खूश राहावी, या उद्देशाने आपल्या घरी बरेच समारंभ पार पडायचे आणि त्या गर्भधारणेचा कालावधी आनंदात आणि उत्साहात जायचा, पण हे सुख 21 व्या शतकात त्या मातेला लाभेल असे वाटत नाही कारण, ती तर गर्भधारणेच्या कालावधीत तिच्या नोकरी, व्यवसायाच्या चिंतेत असणार आहे आणि अशा मानसिकतेचा परिणाम नक्‍कीच तिच्या गर्भावर होणार असतो.

अशा परिणामातूनही समजा देवकृपेने सुद‍ृढ बाळ जन्माला आले तर त्या बाळाला देखील 21व्या शतकातील बाबींना तोंड द्यावं लागणार आहे. त्याची पण जडणघडण ही कुटुंबातील लोकांच्या मायेच्या ओलाव्याखाली कमी प्रमाणात होऊन सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या सान्‍निध्यात जास्त होणार आहे. अशावेळी त्या प्रकारच्या मानसिक आजारांना ते मूल बळी पडणार असते. माया, आपुलकी, नातेसंबंध, प्रेम या भावनेचा तुटवडा असल्यामुळे ही मुले निराशा, एकाकीपणा, निरुत्साह अशा मानसिक आजाराने गुरफटलेली असणार नाही तर आत्महत्या प्रवृत्ती किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीसारख्या टोकाच्या भूमिकासुद्धा घेण्याची शक्यता आहे. याचे ज्वलंत उदाहरण आपण पाश्‍चात्त्य देशात बघू शकतो.

लहानपणापासूनच मुलांच्या हातात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा अतिवापर आणि त्या अतिवापरामुळे जीवनात आलेला एकाकीपणा, दुरावलेले नातेसंबंध आणि मागितलेली वस्तू ताबडतोब मिळणे (Instant Gratification)  व ती वस्तू नाही मिळाली तर मुलाच्या वागण्यामध्ये होणारे टोकाचे बदल या आणि अशा बर्‍याच वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलांच्या मानसिकतेला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. 

या सर्व बाबींचा विचार केल्यास आपणाला असे लक्षात येईल की 21व्या शतकातील मुलांच्या आरोग्याच्या प्रश्‍नासाठी आपण तेवढ्याच क्षमतेने तयार राहणे गरजेचे आहे.

या आपल्या सर्व प्रश्‍नांना होमिओपॅथी ही वरदान ठरणार आहे. होमिओपॅथी प्रत्येक रुग्णाच्या त्याच्या केसनुसार वेगळा विचार केला जातो. त्या मुलाची मानसिकता समजून घेतली जाते, त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत तो कशा पद्धतीने विचार करतो, त्याच्या इच्छा, अपेक्षा काय आहेत, त्याचे त्याच्या कुटुंबातील व्यक्‍तीशी मित्रांशी शाळेतील इतर विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी कसे नातेसंबंध आहेत आणि हे आजारपण नेमके कशामुळे चालू झाले, नेमकी कोणती भावना, प्रसंग या आजारांच्या सुरुवातीला कारणीभूत ठरले आणि त्यावर त्या मुलाची काय प्रतिक्रिया होती, या सर्वांचा अगदी खोलवर विचार केला जातो आणि मगच औषध शोधले जाते.

अशा पद्धतीने त्या केसचा संपूर्ण सविस्तर अभ्यास करून शोधलेल्या औषधांचा परिणाम असा होता की मूल (ती केस) त्याच सभोवतालच्या परिस्थिती राहून त्याच परिस्थितीला एका वेगळ्या सकारात्मक द‍ृष्टिकोनातून बघते आणि त्याच परिस्थितीशी, नातेसंबंधाशी अगदी चांगल्या पद्धतीने जुळवून घेऊन एका नव्या उमेदीने आपल्या आजारावर व बिघडलेल्या मानसिकतेवर मात करून आयुष्य सुकरपणे आणि सकारात्मकपणे जगू शकते.

होमिओपॅथिक औषधांची काही उदारहरणे

Belladona- हे औषध ज्यांना लागू पडते अशी मुले ही मुलांचे वागणे बिनधास्त असते, ही मुलं कोणत्याही गोष्टींकडे गांभीर्याने बघत न बघता, आलेल्या परिस्थितीतून लवकरात लवकर कसे बाहेर पडू हे बघत असतात. या मुलांना बंधन नको असतात.

Lachesis ही मुलंसुद्धा खूपच Hyperactie असतात. त्यांना फक्‍त मजा पाहिजे असते. खेळात नेहमी रममाण असणारी मुलं असतात, खेळ म्हटले की सगळे विसरून जातात एका ठिकाणी कधीही स्थिर बसत नाहीत.

Carcinocia ही अत्यंत गुणी मुलं असतात, सतत दुसर्‍यांची मर्जी राखण्यात आणि दुसर्‍यांना खूश करण्यात अग्रणी असतात. संवेदनशील असतात आणि आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दक्ष असतात.

Coculus Indious आपल्यापेक्षा दुसर्‍यांचा जास्त विचार करणारी, आपल्या माणसांची सर्वात जास्त काळजी करणारी आणि परिस्थितीशी जाण असणारी अशी हां मुले आपल्या कर्तव्यात कधीही कसू न करता आपली जबाबदारी पार पाडतात.

Tarantula- ही अत्यंत खोडकर Hyperactive मुले असतात. दुसर्‍यांना त्रास देण्यात त्यांना खूप मजा येते आणि अशी मुलं फसवी नाटके करण्यात पटाईत असतात.

अशा पद्धतीची अनेक औषधे होमिओपॅथीमध्ये आहेत की ती त्या प्रत्येक मुलांचा वैयक्‍तिकरीत्या अभ्यास करून दिली जातात. आजार कोणताही असू दे, पण त्यांचे व्यक्‍तिमत्त्व परीक्षण आणि त्यांची मानसिक अवस्था याचा सखोल अभ्यास करूनच त्यांना औषध दिली जातात.

म्हणूनच आजारांच स्वरूप जरी बदललं तरीही 21व्या शतकातील येऊ घातलेल्या आजरांशी मुकाबला करण्यासाठी होमिओपॅथी ही एक सक्षम आणि प्रभावी उपचारपद्धती आहे. असे म्हणावे लागेल.

 

Back to top button