मुंबई : कल्याण डोंबिवलीत २४ तासांत कोरोनाचे १३ रुग्ण   | पुढारी

मुंबई : कल्याण डोंबिवलीत २४ तासांत कोरोनाचे १३ रुग्ण  

कल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १३ कोरोना बाधित रुग्‍ण आढळून आले. आणि तीन  कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती डिस्चार्ज होऊन घरी गेले आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यांची संख्या सात असून, त्यात एका वर्षांची बालिका व ६८ वर्षिय ज्येष्ठ नागरिक महिलेचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील डोंबिवली शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुणांची संख्या वाढली आहे. 

वाचा :  ठाण्यात कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काल २४ तासांत केवळ एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागासह कल्याण डोंबिवलीकरांना दिलासा मिळाला होता. मात्र आज शनिवारी आढळलेल्या रुग्णालच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली आहे.१३ रुग्णांची अचानकपणे वाढ झाल्याचे माहिती पालिका सूत्रांनी दिली. यामध्ये डोंबिवली पूर्वेकडील परिसरातील पुरुष १९ वर्षे, ४६ वर्षे, ५५ वर्षे (कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीत).

महिलांमध्ये १७ वर्षे, ४२ वर्षे , ७० वर्षे (कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीत.) तर डोंबिवली पश्चिमकडील परिसरातील मुलगी ०१ वर्षे, ४० वर्ष, ४८ वर्ष व ६८ वर्षाच्या महिलांचा तर २८ वर्ष व ४२ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेकडील ६५ वर्षाच्या एका पुरुषाचाही समावेश आहे. त्याची फॉरेन हिस्ट्री आहे. अशा एकूण तेरा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश असून, त्याची संख्या सात झाली आहे. यामध्ये एक वर्षांची बालिका व ६८ वर्षिय ज्येष्ठ नागरिक महिलेचा समावेश आहे.

वाचा : बांधकाम कामगारांना दिलासा; २ हजार रूपये बँक खात्यात जमा होणार

महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्ण ७३ रुग्णांपैकी २ मयत, २३+३ = २६ डिस्चार्ज देण्यात आला. एकुण ४५ रुग्‍ण उपचार घेत असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .

डोंबिवलीत आजपर्यंत सर्वाधिक ५० रुग्ण सापडले

एकूण रुग्णांची आकडेवारी 

कल्याण पूर्व -१३

कल्याण पश्चिम-९

टिटवाळा -१

मोहणे -१

डोंबिवली पूर्व -३५

डोंबिवली पश्चिम -१५

डोंबिवलीत आजपर्यंत सर्वाधिक ५० रुग्ण सापडले

वाचा : अंगणवाडीतील बालकांना आता घरपोच शिधा

Back to top button