कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेची बुधवारी चौकशी होणार

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली.
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेत ९ प्रवाशांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याप्रकरणी बुधवारी (दि. १९)  जून रोजी ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग चौकशी करणार आाहेत.

या  चौकशीदरम्यान अपघाताशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती हजर राहून पुरावे देऊ शकतात किंवा मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहून माहिती कळवू शकतात, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर बंगालच्या जलपाईगुडी स्थानकाजवळ सोमवारी सकाळी मालगाडी धडकल्याने कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला होता. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळवण्यात आल्या होत्या. रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यावर कांचनजंगा एक्स्प्रेस पहाटे कोलकाताच्या सियालदह स्थानकावर पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news