Stock Market Closing Bell : शेअर बाजारात तेजीची बहार, सेन्सेक्स-निफ्‍टीने गाठले नवे शिखर

Stock Market Closing Bell : शेअर बाजारात तेजीची बहार, सेन्सेक्स-निफ्‍टीने गाठले नवे शिखर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज ( दि.१८ जून) तेजीचे वारे कायम राहिले. सेन्सेक्स-निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही नवीन विक्रमी पातळी गाठली. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक सलग नवव्या दिवशी उच्चांकावर वाढले. चौफेर खरेदीमुळे बाजार वाढीसह बंद झाले. नवीन विक्रमी उच्चांक करत बाजार उच्च पातळीवर बंद झाले. आजच्या व्यवहारादरम्यान निफ्टीने 23,579 आणि सेन्सेक्सने 77,366 चा नवीन विक्रम केला. निफ्टी 92 अंकांनी वाढून 23,557 वर बंद झाला. त्याच वेळी सेन्सेक्स 308 अंकांनी वाढून 77,301 वर बंद झाला. निफ्टी बँक 438 अंकांनी वाढून 50,440 वर बंद झाला.

सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम

आज व्‍यवहाराच्‍या प्रारंभी सेन्सेक्स 243 अंकांच्या वाढीसह 77,235 वर उघडला आणि उघडल्यानंतर 77,326 च्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टी 105 अंकांनी वाढून 23,570 वर उघडला आणि 23,573 वर गेला. निफ्टी बँक 192 अंकांच्या वाढीसह 50,194 वर उघडली, तथापि, निफ्टी बँकेत कमजोरी दिसून आली आणि ती 270 अंकांनी घसरली. संरक्षण समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. अखेर आज व्‍यवहार बंद होताना बाजार नवीन विक्रमी उच्चांकासह बंद झाला. निफ्टी 92 अंकांनी वाढून 23,557 वर बंद झाला.तर सेन्सेक्स 308 अंकांनी वाढून 77,301 वर तर निफ्टी बँक 438 अंकांनी वाढून 50,440 वर बंद झाला.

मिडकॅप 264 अंकांनी वाढून 55,490 वर बंद झाला. आज रिॲल्टी, पीएसई, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आयटी, एनर्जी, इन्फ्रा निर्देशांक वाढीवर बंद झाले. मात्र, फार्मा, एफएमसीजी, मेटल शेअर्सवर दबाव दिसून आला. श्रीराम सिमेंट, पॉवर ग्रिड, विप्रो, आयसीआयसीआय बँक, टायटनमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. तर मारुती सुझुकी, डॉ रेड्डी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, हिंदाल्कोच्‍या शेअर्संनी घसरण अनुभवली.

जागतिक बाजाराचे सकारात्‍मक परिणाम, देशांतर्गत बाजार सुसाट

जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांदरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारातही चांगली वाढ दिसून आली. अमेरिकेच्या S&P आणि Nasdaq मध्‍ये तेजी कायम आहे. याशिवाय कच्च्या तेलावरील करही कमी करण्यात आला आहे. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही खरेदीचा कल दिसून आला. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी दिसली. या सगळ्यामुळे आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 2.04 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच बाजार उघडताचगुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.04 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.4 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 14 जून 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,34,88,147.51 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 18 जून 2024 रोजी बाजार उघडताच तो 4,36,92,883.04 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात २.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सलग नवव्‍या दिवशी मिडकॅप आणि स्मॉलकॅप उच्चांकावर

सेन्सेक्स-निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही नवीन विक्रमी पातळी गाठली. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक सलग नवव्या दिवशी उच्चांकावर वाढले.

पेटीएमचे शेअर्स 3% घसरले

'फिनटेक' कंपनी पेटीएम आणि झोमॅटो यांच्यातील बिझनेस डीलच्या चर्चेमुळे पेटीएमच्या शेअर्समध्‍ये आज घसरण झाली. मंगळवारी शेअर 441 रुपयांवर उघडला होता, परंतु इंट्राडे जवळपास 3 टक्क्यांनी घसरून 412.50 रुपयांवर आला.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला

देशांतर्गत बाजारातील सकारात्मक कल दरम्यान आज ( दि.१८) सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वाढून 83.42 वर पोहोचला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया प्रति डॉलर 83.52 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारांनंतर, ते प्रति डॉलर 83.48 वर पोहोचले. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.५५ वर बंद झाला होता.

अदानी पोर्ट्ससह रेल्‍वे शेअर्सही वधारले

आज अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. बीजिंग-शांघाय हायस्पीड रेल्वे कंपनीला मागे टाकत अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे ​​बाजार भांडवल जवळपास $37 अब्जांवर पोहोचले आहे. वाढत्या मालवाहू आणि भारताच्या बेंचमार्क S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात प्रवेश केल्याने कंपनीला फायदा होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी रेल्वेच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news