अहमदनगर : संगमनेरात ‘त्या’ चार जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह | पुढारी

अहमदनगर : संगमनेरात 'त्या' चार जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा 

संगमनेर शहरातील एका भागात आढळून आलेल्या ‘चौदा नेपाळी तबलिगींपैकी चार नेपाळी तबलिगिंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा अहवाल पुण्याच्या लष्करी प्रयोग शाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाचा :  शहरात लॉकडाऊनची ऐशी-तैशी!

विदेशी नागरिकांना सुरुवातीला संगमनेरतील एका मशिदीत व त्यानंतर रहेमतनगर परिसरातील एका खासगी इमारतीत आश्रय दिल्याच्या कारणावरुन मोमीनपूरा ट्रस्टच्या पाच विश्वस्तांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी चौदा विदेशी तबलिगींना चंदनापुरी घाटातील वृंदावन हॉस्पिटलमध्ये ‘क्वॉरंटाईन’ करण्यात आले होते. चौघांनाही आता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

उर्वरीत दहा जणांना चंदनापुरी घाटातील त्याच रुग्णालयातील ‘विलगीकरण’ कक्षात ठेवण्यात आले आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या चार जणांचा स्वॅब पुण्यातील लष्करी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो वैद्यकीय चाचणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. चौघांची दुसरी चाचणी पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण  संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

डॉक्टरांना सुद्धा होम क्वॉरंटाईन व्हावे लागले

संगमनेर शहरातील इस्लामपुरा भागातील एका महिलेला संशयावरुन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या महिलेने परिसरातील चार वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार घेतले असल्याचे उघड झाल्यामुळे त्या डॉक्टरांना सुद्धा होम क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. त्या महिलेचा स्वॅबचा चाचणी अहवाल आज गुरुवारी  प्राप्त झाला आहे. तो निगेटिव्ह आला असल्याचे  स्पष्ट झाले. त्यामुळे क्वॉरंटाईन झालेल्या त्या चौघा डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला आहे.

वाचा : जामखेडमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह

Back to top button